सहकार
…या संस्थेच्या सभासदांना भेटवस्तू देणार- घोषणा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव शहरातील मुख्य शाखा असलेल्या समता सहकारी पतसंस्थेची 41 वी वार्षिक सभा मोठया उत्साहात संपन्न झाली असून यात सभासदांना 15 टक्के बोनस व भेटवस्तू देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी जाहीर केली आहे.त्याचे उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले आहे.

दरम्यान सभेत संस्थेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त नफा वाटपातून २५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सप्टेंबर महिन्यात सर्व सभासदांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली असून सभासदांनी सर्व विषय सर्वसंमतीने मंजूर केले असल्याचे संचालक संदीप कोयटे यांनी जाहीर केले आहे.
कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेची 41 वी वार्षिक सभा नुकतीच राज्यातील माध्यमात महाठग अशोक खरात यांचे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचे जाहीर झाले असताना व पदाधिकाऱ्यांना इडिची नोटीस जारी झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असताना मोठया उत्साहात संपन्न झाली त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल,संचालक जितुभाई शहा,संचालक संदीप कोयटे,अशोक दरक,दिपक अग्रवाल,गिरीष सोनेकर,कचरू मोकळ,भरत अजमेरा,चांगदेव शिरोडे,कायदेविषयक सल्लागार विजय गवांदे,टॅक्स सल्लागार दत्तात्रय खेमनर यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोयटे म्हणाले की,”दि.३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे १ हजार १२८ कोटी रुपयांच्या ठेवी असून ८२४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.तसेच संस्थेची सुरक्षित गुंतवणूक ३१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.जगातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज योजनेंतर्गत संस्थेने तब्बल ५८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे.संस्थेला आर्थिक वर्षअखेर १३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.सभासदांनी गेल्या चार दशकांपासून समतावर जो विश्वास ठेवला आहे,तोच संस्थेची मोठी ताकद आहे.संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असून समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमअंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ७० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे.याशिवाय संस्थेला आर्थिक वर्षअखेर १३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले व भविष्यातही अधिक पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याची आम्ही खात्री देत असल्याचे त्यांनी शेवटी जाहीर केले आहे.
दरम्यान यावेळी याप्रगत सोसायटीचे व्यवस्थापन समताने स्वीकारले असून समताच्या सहकार्याने सभासद शेतकऱ्यांसाठी अल्पदरात ड्रोनद्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राजेद्र गिरमे यांनी जाहीर केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक उपाध्यक्ष अरविंद पटेल यांनी केले तर अहवाल वाचन महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी केले आहे.तर संचालक संदीप कोयटे यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत खुलासा करत सर्व व्यवहार कायदेशीर असून सभासदांनी विपर्यस्त वृत्तांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करत संचालक मंडळाच्या वतीने सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहे.

