जलसंधारण
जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत-माहिती

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर (वार्ताहर)
जलसंधारणाचे उपक्रम केवळ पाण्याची टंचाई कमी करत नाहीत,तर भूजल पातळी वाढवण्यासही मदत करत असल्याचे प्रतिपादन नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजेणे यांनी संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था केवळ आध्यात्मिक शिक्षण देणारी संस्था नसून समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणारी एक मोठी चळवळ आहे.शिक्षण आणि कौशल्य विकास, योग आणि ध्यान प्रशिक्षण,नशामुक्ती अभियान,महिला सशक्तीकरण,कैद्यांसाठी पुनर्वसन कार्यक्रम अशा विविध उपक्रमांबरोबर व्यक्तिच्या अंतर्गत शांततेपासून समाजाच्या कल्याणापर्यंत या चळवळीचा प्रभाव दिसून येत आहे.त्यांनी संवत्सर येथे हा जलसंधारण उपक्रम सुरू केला आहे.
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार २.० योजनेअंतर्गत व श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संवत्सर परिसरातील चर खोलीकरण व रुंदिकरण कामाचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

आर्ट ऑफ लिव्हिंग ही श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन-१९८१ मध्ये सुरु झालेली सेवाभावी संस्था आहे. ग्रामीण विकास आणि प्रामुख्याने जलसंधारणावर या संस्थेचा विशेष भर असतो.शेतामध्ये चर तयार करुन त्याद्वारे पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे,जमिनीची धूप थांबविणे,भूजल पातळी वाढविणे,पिकांसाठी ओलावा टिकवून ठेवणे यासाठी चरांचा चांगला उपयोग होतो.आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था केवळ आध्यात्मिक शिक्षण देणारी संस्था नसून समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणारी एक मोठी चळवळ आहे.शिक्षण आणि कौशल्य विकास, योग आणि ध्यान प्रशिक्षण,नशामुक्ती अभियान,महिला सशक्तीकरण,कैद्यांसाठी पुनर्वसन कार्यक्रम अशा विविध उपक्रमांबरोबर व्यक्तिच्या अंतर्गत शांततेपासून समाजाच्या कल्याणापर्यंत या चळवळीचा प्रभाव दिसून येत असून या संस्थेने नुकतेच आपले सामाजिक दायित्वाचे काम संवत्सर येथे सुरू केले आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे तालुका समन्वयक सुधीर जायभाय,पर्यवेक्षक श्री.जोंधळे,जलसंधारणचे शिवम सोनवणे,पंचायत समितीचे एकात्मिक महिला व बालविकास योजनेचे पंडितराव वाघिरे,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद दिघे,शाखा अभियंता आश्विन वाघ,श्रीमती खोले,ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे,दिलीप ढेपले, बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे,लक्ष्मण साबळे,चंद्रकांत लोखंडे,शिवाजी गायकवाड,लक्ष्मणराव परजणे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,राजेंद्र भोकरे, दीपक गव्हाळे,रामभाऊ निरगुडे,सोमनाथ घेर, कृष्णा आबक,लक्ष्मणराव पेकळे,हबीब तांबोळी,सुभाष मेहेत्रे,अशोक मेहेत्रे,मारुती निरगुडे यांच्यासह संवत्सर परिसरातील अनेक ग्रामस्थ,शेतकरी,शासकीय अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी प्रास्ताविक संवत्सर ग्रामपंचायत चे उपसरपंच विवेक पारणे यांनी केले तर सूत्रसंचालन सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा अहिरे यांनी मानले आहे.



