सहकार
…या सहकारी संस्थेला ४.५० कोटी रुपयांचा नफा जाहीर!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यात सहकारात अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च २०२६ अखेर एकत्रित व्यवसाय ६७४ कोटींचाअसून नुकत्याच संपलेल्या वित्तीय वर्षात या पतसंस्थेला ०४.५० कोटींचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड.रवींद्र बोरावके यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.

“ज्योती सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीत मागील वर्षाच्या तुलनेत ठेवी मध्ये ४६ कोटी रुपयांची वाढ झाली असून तिचे प्रमाण १३ आहे.तर कर्जामध्ये ३३ कोटी रुपयांची इतकी वाढ झाली असून तिचे प्रमाण १४ % व गुंतवणूकीमध्ये १४% इतकी वाढ नोंदवली आहे”-सुरेश शिंदे,व्यवस्थापक,ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.
राज्यातील आणि देशातील सहकारासह वित्तीय संस्थांचे वित्तीय वर्षे संपले असून त्यात कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्थेचा समावेश आहे.याबाबत संस्थेने नुकताच आपला ताळेबंद जाहीर केला आहे.त्यात ही माहिती दिली आहे.त्यात पुढे म्हटले आहे की,”नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या वर्षात यामध्ये ४०६ कोटी रूपयांच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत तर संस्थेने २६८ कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली आहे.संस्थेची गुंतवणूक १६४ कोटी रूपयांची इतकी झाली आहे.संस्थेचा एकत्रित व्यवसाय ६७४ कोटी इतका झाला आहे.तर ०.००५ एन.पी.ए. अत्यल्प आहे.त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी संस्थेत्त १००% सुरक्षित आहे असल्याचे मानले जात असल्याचा विश्वास संस्थेचे सभासदांसह अध्यक्ष ॲड.रवींद्र बोरावके यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पुर्ण करून सन- २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे.संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पूर्ण करून ठेवी,कर्ज,भागभंडवल व गुंतवणूक या सर्वांमध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे.संस्थेला या ३८ वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने विश्वास वाढतच चाललेला आढळून येत असून संस्थेस,”सर्वात्तम पतसंस्था पुरस्कार” मिळालेला आहे.कर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले,मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगलीं झाली यापुढे यात सातत्य राखले जावुन नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेने सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्याचे दिसून येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड.रवींद्र बोरावके यांनी दिली आहे.

