जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात..या नेत्याची जयंती संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष असलेले नेते व माजी शिक्षण राज्यमंत्री खा.शंकरराव काळे यांची जयंती विविध कार्यक्रमासह आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

दरम्यान स्व.माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांची जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी सहकार,शिक्षण,कृषी,सिंचन,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.कोपरगाव सहकारी कारखान्याचे ते संस्थापक संचालक व सर्वाधिक काळ अध्यक्ष होते.आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रसारात त्यांनी झोकून देऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावोगावी शाळा आणि महाविद्यालयांचे जाळे विणले त्यांच्या १०५ व्या जयंती निमित्त कोपरगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर काळे यांच्या पूर्णाकृती स्मारकास आ.आशुतोष काळे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष असलेले नेते व माजी शिक्षण राज्यमंत्री खा.शंकरराव काळे यांची जयंती विविध कार्यक्रमासह आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी सहकार,शिक्षण,कृषी,सिंचन,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.कोपरगाव सहकारी कारखान्याचे ते संस्थापक संचालक व सर्वाधिक काळ अध्यक्ष होते.आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रसारात त्यांनी झोकून देऊन ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावोगावी शाळा आणि महाविद्यालयांचे जाळे विणले त्यांच्या १०५ व्या जयंती निमित्त कोपरगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर काळे यांच्या पूर्णाकृती स्मारकास आ.आशुतोष काळे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,कैलास ठोळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,सतीश कृष्णानी, माजी उपसभापती मधुकर टेके,शिवाजी ठाकरे,डॉ.अजय गर्जे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,महेमूद सय्यद,जनार्दन कदम,संदिप कपिले,शैलेश साबळे,राहुल शिरसाठ,इम्तियाज अत्तार,बाळासाहेब रुईकर, विरेन बोरावके,रमेश गवळी,सुनिल शिलेदार, फकीर कुरेशी,अजीज शेख,विजय त्रिभुवन, बाळासाहेब आढाव, सुनिल बोरा,डॉ.चंद्रशेखर आव्हाड, सचिन गवारे,मनोज नरोडे,सागर आहेर,सोमनाथ आढाव आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य,मुख्याध्यापक, रयत सेवक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.