जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेस मारली शिटी,कुटुंबास गजाने मारहाण,०८ जणांवर गुन्हा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील वायव्येस सुमारे अठरा कि.मी.अंतरावर असलेल्या धामोरी ग्रामपंचायत हद्दीत आपल्या भावजय घराचे समोर कपडे धूत असताना आरोपी विशाल बाबासाहेब कोळपे यांने तिला शिटी मारल्याने तिने आरोपीच्या थोबाडीत मारल्याचा राग मनात धरून आरोपीने आपल्यासह आई,वडील,आजोबा,चुलते,चुलती,भावजय आदींना त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून आपल्याला लोखंडी गज,लाकडी व प्लॅस्टीकच्या काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले असल्याचा मच्छिंद्र कोळपे,विशाल कोळपे यांचेसह आठ जणांवर फिर्यादी ज्ञानेश्वर दादासाहेब पगार (वय-२८ वर्षे) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने धामोरीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

धामोरी येथील मारहाणीत जखमी आजोबा.

“मजबूत संस्था राजकारण्यांवरील अवलंबित्व कमी करतात,नागरिक सरकारी कार्यालयांशी थेट संपर्क साधू शकतात आणि त्यांना वेळेवर सेवा मिळू शकतात,तेव्हा त्यांना राजकारण्यांसमोर जाऊन हात जोडून उभे राहण्याची गरज उरत नाही.अनेक राजकीय नेत्यांना,सत्ता फक्त राबवायची नसते,तर तिचे प्रदर्शनही मांडायचे असते.अशा वेळी त्यांना प्रामाणिकपणे काम करणारे आणि स्वतंत्र वृत्तीचे अधिकारी नको होतात.आणि त्यांना बदलीला सामोरे जावे लागते हे वास्तव आहे.त्यामुळे त्यांनी तरी का त्या फंदात पडावे ?त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी वाढली नाही तर नवल !

   सर्वोच्च न्यायालयाने अलीकडील काळात सात वर्षाच्या आतील शिक्षा असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यास प्रतिबंध केला असल्याने पोलिसांचे हात बांधले गेले आहे.त्यामुळे पोलिसांच्या धाक कमी होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.शिवाय त्यामुळे आरोपी आता चेकाळले असल्याचे दिसून येत आहे.शिवाय पोलिसांचे राजकीयकरण झाल्याने किरकोळ गुन्ह्यात राजकीय नेते आणि त्यांच्या स्विय साहाय्यकांची बुळबुळ वाढली असल्याचे दिसून येत आहे.परिणामी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या वास्तवाला रोजच्या रोज तोंड द्यावे लागते.सरकारच्या बहुतेक खात्यांना राजकीयदृष्ट्या तटस्थ अधिकारी बहुतेकदा नकोच असतात.निष्पक्ष अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षालाही रुचत नाही.त्यामुळे अर्थातच पसंती दिली जाते ती ‘रबर स्टॅम्प’ अधिकाऱ्यांना.कारण ते एकही प्रश्न न विचारता,अगदी राजकारण्यांच्या नातेवाईकांचेही आदेश पाळतात.याचा आता कोपरगाव तालुक्यात रोजच अनुभव येऊ लागला आहे.राज्यातील निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे जनतेच्या समस्या मांडत असले तरी त्यांच्यापैकी बहुतेक जण पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देऊ शकणाऱ्या यंत्रणेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत,त्याची ही अनिच्छा भीती आणि असुरक्षिततेतून निर्माण होते.मजबूत संस्था राजकारण्यांवरील अवलंबित्व कमी करतात,नागरिक सरकारी कार्यालयांशी थेट संपर्क साधू शकतात आणि त्यांना वेळेवर सेवा मिळू शकतात,तेव्हा त्यांना राजकारण्यांसमोर जाऊन हात जोडून उभे राहण्याची गरज उरत नाही.

जखमी फिर्यादी इसम.

  

दरम्यान एका माहितीनुसार या दोन कुटुंबातील वादाचं कारण वेगळे असल्याचे समोर आले असून या दोन्ही कुटुंबातील तरुण-तरुणीने सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला असल्याने पगार कुटुंब संतापले असल्याची माहिती ग्रामस्थांत आहे.त्यातून ते सतत खोडी काढत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यातच कोळपे यांची जलवाहिनी आणि रस्ता हा पगार यांचे जमिनीतून गेला असल्याने वारंवार त्यांची भांडणे होत आहे. त्यातून आधी पगार यांनी हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.याआधीही धर्मबिजेच्या दिवशी तक्रारी झाल्या होत्या त्यात स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून त्यांना थांबवले असल्याच्या बातम्या आहेत.मात्र परत दोन कुटुंबात हा वाद नुकताच उफाळून आल्याने हा अनर्थ घडला आहे.कोळपे यांनीही त्यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला दुजोरा दिला आहे.

अनेक राजकीय नेत्यांना,सत्ता फक्त राबवायची नसते,तर तिचे प्रदर्शनही मांडायचे असते.अशा वेळी त्यांना प्रामाणिकपणे काम करणारे आणि स्वतंत्र वृत्तीचे अधिकारी नको होतात.आणि त्यांना बदलीला सामोरे जावे लागते हे वास्तव आहे.त्यामुळे त्यांनी तरी का त्या फंदात पडावे ? अशी वर्तमानात स्थिती निर्माण झाली आहे.त्याला एकतर्फी त्यांना तरी कसा दोष देणार ? त्यामुळे अशा घटनात वाढ झाली असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.परिणामी धामोरी सारख्या घटकात वाढ झाल्यास नवल नाही.महिलेला शिटी मारून अवमान,गुन्हा (विनयभंग!) करायचा आणि वरून त्यांनाच मारहाण करायची हे मोगली संकट लोकशाहीत अवतरावे ही विचार करायला लावणारी घटना समजली पाहिजे.आणि यावर राजकीय नेत्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे.त्यातून त्यांना याबाबत गांभीर्य आहे असे समजले जाईल.त्यासाठी समाजाने दबाव वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

हाणामारीतील जखमी इसमास दवाखान्यात लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवताना नातेवाईक दिसत आहेत.

  दरम्यान या घटनेतील धामोरी येथील रहिवासी आरोपीं मच्छींद्र कोळपे,सतीष बापु कोळपे,विशाल बाबासाहेब कोळपे,सागर बाबासाहेब कोळपे,बाबासाहेब कोळपे,नामदेव शिवाजी कोळपे,संजय बापु कोळपे,हरीभाऊ कोळपे आदी विरुद्ध फिर्यादी आणि त्याचे फिर्यादीसह वडील दादासाहेब पगार,आई शोभाताई दादासाहेब पगार,आजोबा रंगनाथ देवराम पगार,चुलते राजेंद्र रंगनाथ पगार,भावजय मीरा गणेश पगार,चुलती वैशाली पगार आदींना गज काठी,हॉकी स्टिक आदींनी गंभीर मारहाण केली तर भाऊ गणेश याला मारहाण करण्याचा प्रयत्न करून तेथील दोन ट्रॅक्टर,मारुती ८०० ही चारचाकीचे व दोन मोटार सायकलच्या टाक्या,पॅनल,हेडलाईट फोडून मोठे नुकसान केले आहे.शिवाय आईचे गळ्यातील एक ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तोडून नेली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी भेट दिली आहे.दरम्यान शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी दोन्ही कुटुंबाची बैठक घेऊन त्यांना समजावून सांगण्याचे काम केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

    दरम्यान यातील प्रमुख आरोपीने सदर महिलेला ती आपल्या सासऱ्याचा मार वाचविण्यासाठी मध्ये पडल्याने  तिला घरात घुसून गंभीर मारहाण केली असून तिला नको त्या ठिकाणी दुखापत केली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

  दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२),१८९(२),१९१,(२) (३),१९०, ११९(१),३२४ (४) प्रमाणे आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी  हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close