जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत…या जिल्हाचे वर्चस्व !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राज्यातील ग्रामिण भागातील युवा खेळाडूना सुवर्णसंधी प्राप्त व्हावी म्हणून राज्यस्तरीय १७ वी सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा नुकत्याच शिर्डी येथील गोल्डन क्रिकेट अँकडमी व के.पी.क्रिकेट अँकडमीच्या भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली आहे.या स्पर्धाचे पारितोषिक वितरण आशियाई श्रीभारत व महाराष्ट्र श्री तसेच जागतिक स्पर्धा विजेते बॉडीबिल्डर किरण पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले असून या स्पर्धेत सब ज्युनिअर राज्यस्तरीय बेसबाँल स्पर्धा मुले जळगांव जिल्हा प्रथम,अमरावती जिल्हा व्दीतीय,कोल्हापूर जिल्हा तृतीय,अहिल्या नगर जिल्हा चतृर्थ क्रमांक पटकावला आहे.

  

दरम्यान या स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे आहे.१७ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय बेसबाँल स्पर्धा मुले जळगांव जिल्हा प्रथम,अमरावती जिल्हा व्दीतीय,कोल्हापूर जिल्हा तृतीय,अहिल्या नगर जिल्हा चतृर्थ क्रमांक पटकावला आहे.

   या प्रसंगी साई निर्माण समुहाचे विजय कोते,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे महासचिव राजेंद्र इखणकर , उपाध्यक्ष इंद्रजीत नितीनवार ,अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अरुण चंद्रे , अजय देशमुख उपस्थित होते.

   दरम्यान या खेळाडुना मार्गदर्शन करताना किरण पाटील म्हणाले की बेसबाँल या खेळाचे उज्वल भविष्य आहे.खेळाडुनी यश प्राप्तीसाठी मेहनत घ्यावी.पुढील काळात बेसबाँल असोसिएशनला आवश्यक सहकार्य करण्याचे जाहिर केले.महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन महासचिव राजेंद्र इखणकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

   महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सहसचिव तथा अहिल्यानगर जिल्हा सचिव मकरंद को-हाळकर यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे.
अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी राज्यातील संघांनी सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले आहे.

   या स्पर्धेच्या आयोजनासाठी,सह सचिव कल्पेश भागवत तसेच रिजवान पठाण प्रा.सुनिल कुटे,छत्रपती अवार्ड विजेते अक्षय आव्हाड,उमेश वाघोले,कन्हैया गंगुले,आकाश शिंदे, सोमनाथ सपकाळ,युवराज मांडकर,गणेश गायकवाड आदिंनी विशेष परीश्रम घेतले होते.या स्पर्धात एकुण २० मुलांचे व१८ मुलीचे संघ सहभागी झाले.या स्पर्धेमुळे शिर्डी येथे क्रीडामय वातावरण तयार झाले होते.

  दरम्यान या स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे आहे.१७ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय बेसबाँल स्पर्धा मुले जळगांव जिल्हा प्रथम,अमरावती जिल्हा व्दीतीय,कोल्हापूर जिल्हा तृतीय,अहिल्या नगर जिल्हा चतृर्थ क्रमांक पटकावला आहे.

   दरम्यान मुलीच्या स्पर्धेत अमरावती  जिल्हा प्रथम,जळगांव जिल्हा व्दीतीय,नांदेड जिल्हा तृ़तीय,लातुर जिल्हा  चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.

  दरम्यान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पेश भागवत यांनी तर आभार पंच प्रमुख आनंदा कांबळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close