जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पहिली सर्वसाधारण सभा,पत्रकारांना बंदी,कोपरगाव पालिकेतील प्रकार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   देशभरात मोदी सरकार विरुद्ध माध्यमांना पुरेसे विचार स्वातंत्र्य दिले जात नसल्याचा आरोप करून सर्रास गोदी मिडियाचा आरोप होत असताना व त्यावरून ते टीकेचे धनी ठरलेले असताना त्याची अनुभूती आता कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील नगरपरिषदेत येऊ लागली असून आज नव्याने निवडून आलेल्या भाजप (कोल्हे गटाच्या) नगराध्यक्षांनी पहिली सर्वसाधारण सभा बोलावली असताना त्या सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारून आपली आगामी दिशा आणि वाटचाल अधोरेखित केली असल्याचे मानले जात आहे,त्यामुळे माध्यमांनी ही विचार स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची टिका केली आहे.

पीठासन अधिकारी पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,मुख्याधिकारी सुहास जगताप आदी दिसत आहे.

याबाबत विरोधी गटाचे नगरसेवक जनार्दन कदम यांचेशी बोलणे केले असता त्यांनी,”पत्रकारांना सभागृहात बसू देणे ही काळाची गरज आहे याबाबत आम्ही याबाबत पत्रकाराबरोबर राहु” असे आश्वासन दिले आहे.तीच बाब नगरसेवक महमूद सय्यद यांनी,” पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने त्यांचे असणे ही बाब अत्यंत गंभीर आहे.त्यांना बसून दिल्याशिवाय सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक नेमके काय करतात हे जनतेला कसे समजणार ? असा सवाल केला करून त्यास दुजोरा दिला आहे.

   कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक दि.20 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली आहे.त्यात भाजप कोल्हे गटास 19 जागा तर काळे गटास 1 जागा तर शिवसेना बंडखोर गटास 04 जागा प्राप्त झाल्या आहेत.आता स्वप्न रंजन संपून आता खऱ्या अर्थाने त्यांचा प्रपंच सुरू झाला आहे.त्यातच 03 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची पहिलीच बैठक नगराध्यक्ष पराग संघान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.त्यात त्यांनी शहरातील महिलाना निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे आज स्वच्छता गृह बांधण्यासाठीची तरतूद 0.50कोटी लाख रुपयांवरून वाढवून 01 कोटी तर शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी 0.50 कोटी रुपयांवरून 01 कोटी तर शहरातील विविध बागांचे सुशोभीकरण कारणासाठी 01 कोटींची तर आपत्ती व्यवस्थापना तथा शहराचे आरोग्य आणि रोगराई निर्मूलन आदीसाठी 0.60 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली असताना आज पहिलीच सर्वसाधारण सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात हा प्रकार उघड झाला असून यात नगराध्यक्ष पराग संघान यांनी पत्रकारांना बसण्यास मज्जाव केला असल्याची बाब उघड झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

नव्याने निवडून आलेल्या उपस्थित महिला नगरसेविका दिसत आहेत.

“आम्ही पत्रकारांना बाहेर काढले ही माहिती चुकीची असल्याचे सांगून त्यांना शूटिंग करून दिले होते.व त्यांना सभागृहात झालेल्या सभेचे वृत्त देत जाणार असल्याचे सांगून यात काही उणीव राहिली असेल तर आम्ही आगामी काळात नगराध्यक्ष संधान यांनी बोलणे करून यात सुधारणा करू” प्रसाद आढाव,गटनेते,भाजप कोल्हे गट,कोपरगाव नगरपरिषद.

   दरम्यान या सभेचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पराग संधान हे होते.तर या सभेस उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते प्रसाद आढाव,विरोधी पक्षाच्या गटनेत्या गौरी मंदार पहाडे,मुख्याधिकारी सुहास जगताप आदिसंह राष्ट्रवादीचे नगरसेवक जनार्दन कदम,मेहमूद सय्यद आदीसह बहुसंख्येने नगरसेवक,विविध विभागाचे विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

   दरम्यान व सभेत ऐन वेळच्या विषयासह एकूण 31 विषय विषय पत्रिकेवर होते.त्यात सर्व विषय विरोधी गटाच्या संमतीसह मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र यात शहरातील अतिक्रमण विषय हा ऐरणीवर असल्याचे उघड झाले असून त्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचे उघड झाले आहे.मागील काही दिवसात निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अतिक्रमण मोहीम पुन्हा एकदा तीव्र झाली असल्या दिसून येत आहे.कोपरगाव शहरात बैल बाजाररोड लगत नवीन बांधकाम केलेले मात्र अद्याप उद्घाटन न केलेल्या मंगल कार्यालय (बँक्वेट हॉल) संचालकांना नगरपरिषदेने अतिक्रमणाची नोटीस बजावली होती.त्यानंतर छोट्या पुलाजवळून अतिक्रमण उच्चाटन सुरू होऊन ते जोरात सुरू झाले असताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी धावाधाव करून थांबवली असल्याचे दिसून आले होते.त्यानंतर आता ही मोहीम थंड बस्त्यात जाईल असे वाटत असताना आज विषय क्रमांक 19 वर येऊन तो पुन्हा एकदा अजेंड्यावर आला असल्याचे दिसून आले आहे.त्यात आज संपन्न झालेल्या सभेत कोपरगावातील अतिक्रमण हटवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे छोटे व्यावसायिक आणि टपरीधारक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत प्रसाद आढाव,अतुल काले,विक्रम सातभाई सह मान्यवर उपस्थित नगरसेवक.

“पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बसू न दिल्याबाबत आमच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष पराग संधान यांना विचारणा केली असता त्यांनी सभागृहात जागा उपलब्ध नसल्याची लंगडी सबब पुढे केली आहे.व सभा संपल्यावर आम्ही माहिती देणार असल्याचे सूतोवाच केले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात त्याच सभागृहात मात्र सर्व पत्रकार बसत होते ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी आगामी काळात हळूहळू करू” असे निसरडे उत्तर दिले आहे.

   दरम्यान आजच्या सभेत विषय क्रमांक 22 मध्ये शहरातील महिलांसाठी आवश्यक शौचालये बांधण्यास प्राधान्य देण्यात आले असल्याचे दिसून आले ही स्वागतार्ह बाब आहे.त्यासाठी उपस्थित नगरसेविका आणि नगरसेवक आदींनी आवाहन करून जागा सुचविण्यास सांगण्यात आले आहे.मात्र मागील नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर करून ही त्यांना शहरात कोणी जागाच उपलब्ध करून न दिल्याने आपली मोहीम थंड बस्त्यात गुंडाळून ठेवावी लागली होती.हा अनुभव ताजा असताना सत्ताधारी गटाचे हे मोठे धाडस गणले जात आहे.स्वच्छतागृह प्रत्येकाला हवे आहे.पण ते स्वतःच्या घराजवळ नको आहे.हा संकुचित दृष्टिकोन याला कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.आता ही नवीन,’विटी नवी राज्य’ काय दिवे लावणार हे लवकरच कळणार आहे.

  दरम्यान विषय क्र.२३ मध्ये बांधकाम विभागाच्या अहवालानुसार वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना अंतर्गत नगरपरिषद हद्दीत नमो उद्यान विकसित करणेकामी जागा निश्चित करणेसाठी विचार विनिमय करण्यात आला असून त्यास सर्वानुमते मंजुरी दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र सदर जागा नेमकी कोणती याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने सत्ताधारी गटाचे नेते प्रसाद आढाव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी जागा नगरसेवकांकडून मागवली आहे.त्यासाठी एक कोटींचा निधी मिळणार असल्याने त्यासाठी मोठी जागा लागणार आहे.त्यासाठी दोन किंवा तीन बाजूंनी रस्ते आवश्यक असल्याचे निकष त्यांनी सांगितले आहे.तांत्रिक बाबी अद्याप माझ्याकडे उपलब्ध झाल्या आम्ही त्या झाल्या की आपणास कळवतो असे गटनेते आढाव यांनी म्हटले आहे.

दरम्यान विषय क्र.२८- बांधकाम विभागाच्या अहवालानुसार नगरोत्थान महाभियान अंतर्गत कोपरगांव शहर भुयारी गटार योजना अंतर्गत अंबिकानगर,गरीमानगर, अन्नपुर्णानगर या भागाचा समावेश टप्पा क्र.१ मध्ये होणे बाबत विचार विनिमय करणेबाबत ठराव मंजूर झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  दरम्यान विषय क्र.५ नुसार विद्युत विभागाच्या अहवालानुसार कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील सर्व पथदिवे (स्ट्रीट लाईट) सौर पॅनलवर रुपांतरीत करणे व नगरपरिषद मालकीच्या मोकळ्या जागेवर सोलर प्लेट बसविणे बाबत ठराव मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर विषय क्र.६ नुसार मार्केट विभागाच्या अहवालानुसार कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांतर्गत फ्लेक्स बोर्ड छपाई करणेकामी द्वी लिफाफा पद्धतीने निविदा मागवीणेबाबत विचार विनिमय करण्यात आला आहे.शिवाय विषय क्र.७- अन्वये अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार कोपरगांव नगरपरिषद अग्निशमन विभागाकडील वाहनांकरिता अग्निशमन साहित्य व इतर उपकरणे पुरवठा खरेदी करिता वार्षिक निविदा मागविणेकामी एकमताने मंजुरी दिली आहे.

   या खेरीज विषय क्र.१० नुसार संगणक विभागाच्या अहवालानुसार कोपरगांव नगरपरिषदेच्या साठवण तलाव क्र.१,२,३,४, व ५ येथे सी.सी.टी.व्ही.कॅमेरा सिस्टीमचे साहित्यासह बसविणे करिता निविदा मागविणेकामी मंजुरी देण्यात आली आहे.दरम्यान विषय क्र.१७ नुसार नगररचना विभागाच्या अहवालानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या सिटी सर्व्हे नं.१२११ व २०५८,२०५१ मधील दुकान केंद्राचे भाडे निश्चित करणेबाबत ठरावाला हिरवा झेंडा दाखवला असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.विषय क्र.१२ नुसार वाचनालय विभागाच्या अहवालानुसार कोपरगांव नगरपरिषद संचालित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय करिता सन-२०२५-२०२६ करिता ग्रंथ खरेदी करण्यासाठी संमती दिली असल्याची माहिती हाती आली आहे.

   विषय क्र.२ नुसार पाणीपुरवठा विभागाकडील विविध निविदा मागविणेकामी मंजुरी  देण्यात आली आहे.त्यात राष्ट्रवादीच्या महिला नगरसेवक सोनम त्रिभुवन यांनी  या निविदा या पारदर्शक पद्धतीने काढाव्या अशी मागणी केली असता पीठासन अधिकारी संधान यांनी पारदर्शक म्हणजे काय ? असा प्रति सवाल केला असता त्यांना निरुत्तर व्हावे लागले असल्याची बातमी आहे.त्याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाना बँकेच्या सभागृहात बैठक घेऊन सूचना केल्या असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे ही भंबेरी उडाली असल्याच्या बातम्या आहेत.याशिवाय विषय क्र.२६ नुसार बांधकाम विभागाच्या अहवालानुसार गोदावरी नदी छोटा पुलास संरक्षण कठडे व रेलिंग दुरुस्त करणेकामी सकारात्मक दिशा दिली असल्याचे समजते आहे.आदी विषय मंजूर झाले असल्याची माहिती हाती आली असून आजच्या सभेत सर्व नगरसेवकांनी आम्ही विकासासाठी सत्ताधारी गटासोबत असल्याचे संदेश दिले असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बसू न दिल्याबाबत आमच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष पराग संधान यांना विचारणा केली असता त्यांनी सभागृहात जागा उपलब्ध नसल्याची लंगडी सबब पुढे केली आहे.व सभा संपल्यावर आम्ही माहिती देणार असल्याचे सूतोवाच केले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात त्याच सभागृहात मात्र सर्व पत्रकार बसत होते ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी आगामी काळात हळूहळू करू असे निसरडे उत्तर दिले आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान सत्ताधारी गटांचे गटनेते प्रसाद आढाव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आम्ही पत्रकारांना बाहेर काढले ही माहिती चुकीची असल्याचे सांगून त्यांना शूटिंग करून दिले होते.व त्यांना सभागृहात झालेल्या सभेचे वृत्त देत जाणार असल्याचे सांगून यात काही उणीव राहिली असेल तर आम्ही आगामी काळात नगराध्यक्ष संधान यांनी बोलणे करून यात सुधारणा करू असे आश्र्वासित केले आहे.

   दरम्यान याबाबत विरोधी गटाचे नगरसेवक जनार्दन कदम यांचेशी बोलणे केले असता त्यांनी,”पत्रकारांना सभागृहात बसू देणे ही काळाची गरज आहे याबाबत आम्ही याबाबत पत्रकाराबरोबर राहु” असे आश्वासन दिले आहे.तीच बाब नगरसेवक महमूद सय्यद यांनी,” पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने त्यांचे असणे ही बाब अत्यंत गंभीर आहे.त्यांना बसून दिल्याशिवाय सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक नेमके काय करतात हे जनतेला कसे समजणार ? असा सवाल केला करून त्यास दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close