शिर्डी लोकसभा मतदार संघ विकास कामे
बिबट्यांची दहशत…या खासदारांचा लोकसभेत प्रश्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाढत्या बिबट्यांच्या आणि वाघांच्या हल्ल्यांमुळे भितीचे वातावरण-वाढती मानवी जीवितहानी टाळण्यासाठी केन्द्र व राज्य सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीतअशी मागणी शिर्डीचे खा.भाउसाहेब वाकचौरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतीच केली आहे.

“शिर्डी लोकसभा क्षेत्रातील संगमनेर,राहाता,श्रीरामपूर,अकोले,आदी तालुक्यांमध्ये वाघांचा वावर सर्वाधिक वाढला असून शेतकरी,दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत.शेती पशुपालन व दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे.अनेक गांवांमध्ये शाळा मजुरी आणि शेतीकामावर मर्यादा येत असून संपूर्ण ग्रामीण जीवन विस्कळीत झाले आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी.
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.शेतात काम करणं,रात्री बाहेर पडणं तर दूरच,आता दिवसा सुद्धा शेतात काम करणे किंवा घराबाहेर पडताना शेतकऱ्यांना आणि नागरिकांना भीती वाटत आहे.अनेक गावांमध्ये आणि शहराच्या उपनगरांत बिबट्यांचा वावर वाढल्याने सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. सन -२०२४-२५ हे विक्रमी हल्ल्यांचे वर्ष मानले जात असून हे वर्ष बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी सर्वाधिक भयावह ठरले आहे.या वर्षी ८ नागरिकांचा मृत्यू,४७ जखमी,आणि तब्बल ४,५१२ जनावरांचा बळी गेला होता.शासनाने ६९४.०७ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली असल्याची माहिती आहे.दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थिती करून केंद्रीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खा.वाकचौरे यांनी पुढे म्हटले आहे की,”शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून यामुळे ग्रामीण भागात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.शिर्डी चे शिवसेना खा.वाकचौरे यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या अतारांकित प्रश्न संख्या ३५६ च्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.शिर्डी लोकसभा क्षेत्रातील संगमनेर,राहाता,श्रीरामपूर,अकोले,आदी तालुक्यांमध्ये वाघांचा वावर सर्वाधिक वाढला असून शेतकरी,दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत.शेती पशुपालन व दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे.अनेक गांवांमध्ये शाळा मजुरी आणि शेतीकामावर मर्यादा येत असून संपूर्ण ग्रामीण जीवन विस्कळीत झाले आहे.केन्द्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार,सन-२०२० ते जून २०२५ या कालावधीत देशभरात वाघांच्या हल्ल्यामुळे झालेल्या मानवी मृत्युंपैकी सर्वाधिक मृत्यु महाराष्ट्रात झाले आहेत.महाराष्ट्रातील आकडे वारीनूसार,सन-२०२० मध्ये ३९ मृत्यु,सन-२०२१ मध्ये ५४ मृत्यु,सन-२०२२ मध्ये ८० मृत्यु,सन-२०२३ मध्ये ३७ मृत्यु,सन-२०२४ मध्ये ४१ मृत्यु,सन-२०२५ मध्ये जून पर्यंत २७ मृत्यु अशा ऐकून २७८ हून अधिक नागरिकांनी वाघांच्या हल्ल्यांमध्ये आपले प्राण गमावले आहेत.यात शेतकरी, महिला,शाळेकरी मुले यांचा समावेश आहे.
दरम्यान केन्द्र सरकारने आपल्या उत्तरात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२,राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण (एन.टी.सी.ए.),तसेच मानक कार्यपध्दती (एस.ओ.पी.) अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे.तसेच वाघ पुनर्वसन,जनजागृती,आवश्यक औषधांची खरेदी,प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्यतेच्या योजना असल्याचे सांगण्यात आले आहे.या योजनाद्वारे राज्यांना आर्थिक सहायता प्रदान करण्यात येत असल्याचे ही उत्तरात स्पष्ट केले आहे.शिर्डी लोकसभा क्षेत्रातील सर्व संघर्षग्रस्त वाघांची तात्काळ ओळख करुन त्यांना पकडून सुरक्षित वन/व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करण्याची मागणी यावेळी खा.वाकचौरे यांनी शेवटी केली आहे.


