जाहिरात-9423439946
आंदोलन

…या शहरात भूमिगत गटारीवरून शिमगा ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामावरून भरत मोरे,अनिल गायकवाड,विनय भगत आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले होते.त्यावरून नगरपरिषदेतील सत्ताधारी गट आणि विरोधी आ.काळे गट आणणे सामने आले असून आरोपी प्रत्यारोपांच्या फेरी झडल्या असून त्यातून प्रश्न राहिला बाजूला मात्र जनतेची करमणूक होताना दिसत आहे.यात आगामी 27 जानेवारीला समक्ष पाहणी  करून वर्तमान काम निकृष्ट असेल तर पुढील होणारे थांबविण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते भरत मोरे,अनिल गायकवाड,विनय भगत आदींनी दिली आहे.

 

“तत्कालीन आ.आशुतोष काळे यांचे कार्यकाळातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे व या कामासंदर्भात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेच हे काम आमदार काळे यांच्या कार्यकाळात सुरू झाल्याची कबुली देत असल्याचा दावा कोपरगाव नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती निलोफर पठाण यांनी केला आहे.

  कोपरगाव शहरात वर्तमानात नगरपरिषदेच्या वतीने भूमिगत गटारीच्या 272 कोटी रुपयांचे मोठे कोडकौतुक होऊन त्याचे काम ढोल ताशे वाजवत सुरू झाले होते.मात्र सदर काम निकृष्ट होत असल्याची हाक मनसेचे अनिल गायकवाड,उद्धव सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे,विनय भगत यांनी आधी निदेवन देऊन नगरपरिषदेला सजग करत दोन दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले होते.त्याची दखल घेऊन आज नगराध्यक्ष पराग संधान यांनी आणि मुख्याधिकारी सुहास जगताप व सत्ताधारी गटाचे नगरसेवक आदींनी आंदोलनकर्त्यांना विविध पक्षाचे नगरसेवक आणि विविध पक्षाचे कार्यर्त्यांचे शिष्ट मंडळ बनवून आगामी पाच दिवसात त्याचे समक्ष पाहणी करून कारवाई करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

आंदोलनकर्त्यांनी आ.काळे गटाचे कार्यकत्यांनी घेतलेली भेट.

   दरम्यान त्या आंदोलनाला आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे गटाचे गटनेते गौरी पहाडे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,त्यांचे सहकारी नगरसेवक आदींनी भेट दिली आहे.त्यानंतर सत्ताधारी गटाने त्या ठिकाणी हजेरी लावून सदर आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.त्याला मोठ्या मिनतवारीने त्यांना शेवटी यश आले आहे.त्यात आगामी प्रजासत्ताक दिन संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 जानेवारी रोजी आंदोलनकर्ते कार्यकर्ते व सत्ताधारी गटाचे शिष्टमंडळ आदी मान्यवर शारदानगर,गिरमे वस्ती,साई सिटी,भामानगर आदी ठिकाणी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देणार आहे.त्या आरोपात तथ्यांश आढळला तर सदर कामाची शौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्यामुळे त्यात सामील असलेल्या संशयितांवर टांगती तलवार राहणार आहे.आगामी काळात काय कारवाई होणार हे पुढे असले तरी मात्र त्यावरून शहरात सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांचेत मोठा शिमगा सुरू झाला आहे.या निकृष्ट कामाला जबाबदार कोण यावरून हे रणकंदन सुरू झले आहे.आज दुपारी 1.40 च्या सुमारास हे आंदोलन लेखी देऊन समारोप केला आहे.त्यामुळे आता आगामी काळात संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यावर टांगती तलवार राहणार असल्याचे दिसून येत आहे.

आ.काळे गटाचे कार्यकर्ते.

    दरम्यान याबाबत विरोधी आ.काळे गटाचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी सत्ताधारी गटावर आरोप करताना म्हटले आहे की,”मागच्या काळात ४२ कोटींच्या पाणी योजनेचे काय झाले त्याचा अजून पर्यंत उलगडा झालेला नाही.अशा मोठ्या योजनांना निधी आणूनही कोपरगावकरांच्या अडचणी सुटणार नसेल काय उपयोग.आम्ही छोटे चेंबर मागणी करतोय पण ते होत नाही.नगराध्यक्षांनी ठेकेदाराला सांगितले आहे की,चेंबरचे काम बंद करा.हि गटारीच्या कामाची कोणती पद्धत आहे.तुमचे आणि त्या ठेकेदाराचे काय असेल ते नंतर पहा अगोदर शहर विकासाकडे लक्ष द्या आणि नागरिकांना त्रास होईल असं काही करू नका असे सांगत हनुमाननगर भागामध्ये एक व्यक्ती चेंबर मध्ये पडून मृत झाल्याची आठवण करून दिली आहे.दरम्यान आज जरी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले असले तरी यापुढे कोपरगाव नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्षांनी जबाबदारी घेवून खबरदारी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी शेवटी केले आहे.

    दरम्यान या सत्ताधारी गटाचे कार्यकर्त्यांनी याबाबत तत्कालीन आमदारांच्या (काळे ) कार्यकाळातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा दावा केला आहे.विशेष म्हणजे या कामासंदर्भात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेच हे काम आमदार काळे यांच्या कार्यकाळात सुरू झाल्याची कबुली देत असल्याचा दावा केला आहे.या संपूर्ण प्रकरणात झालेला भ्रष्टाचार,निकृष्ट दर्जा व प्रशासनिक निष्क्रियतेची जबाबदारी नेमकी कोणाची याचा शोध घेणे आवश्यक ठरत असल्याचा आरोप नूतन बांधकाम सभापती निलोफर पठाण यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close