जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध -…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

  महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्ध झाले आहेत.पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे. कथा-कादंबऱ्यांची त्यांची २२ भारतीयच,तर परकी भाषांतरे झाली असून ही सामान्य गोष्ट नसल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद  काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

या वेळी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघीनाला  विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वही,पट्टी,पेन,पेन्सिल,रबर व अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारीत पुस्तक वाटप केले आहे.

   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील वाघीनाला वस्ताद प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी छायाताई  काळे,मंगलताई खरे,सोनाली खरे,मोनिका पगारे,वनिता खरे,वस्ताद प्रतिष्ठान संवत्सर विशाल पगारे,राहुल खरे,प्रदीप खरे,रावसाहेब खरे,रामभाऊ खरे,महेफुज शेख,रंगनाथ पगारे,वैभव पगारे,कांतीलाल पगारे,कृष्णा पगारे,भानुदास खरे,दत्तात्रय खरे,साहिल बागुल,सुरज खरे,जीवन खरे,समाधान खरे,समरप्रीत खरे,दिगंबर खरे,कृष्णा खरे,श्रेयस पगारे,संदीप खरे,दिलीप खरे,बाळासाहेब बागुल,जनार्दन पगारे,विशाल खरे आदी मान्यवर ऊपस्थित होते.

त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा सर्वप्रथम कोपरगाव येथे स्थापन केला याबद्दल माहिती दिली,त्यांच्या गावी जावुन फोटो मिळवुन पुतळा तयार करून घेतला त्यानंतर कोपरगाव येथे स्थापन केला.यानंतर इतर ठिकाणी अनेक पुतळे उभे राहिले.कठीण परिस्थितीमुळे अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण जरी कमी झाले मात्र आज सर्व शाळेत त्यांचे चरित्र अभ्यासाला आहे.याचे कारण त्यांचे ज्ञानाची दखल परदेशात देखील घेतली गेली असल्याचे शेवटी सांगितले आहे.

  सदर प्रसंगी प्रारंभी अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल पगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब बागुल यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close