कोपरगाव तालुका
पत्रकार बांधवाना शासनाने मदत करावी-अँड.पोळ
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/04/images-2020-04-08T171936.359.jpeg)
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रातिनिधी)
करोना साथीचा विळखा देशात दिवसेंदिवस वाढत असून डॉक्टर,पोलीस व महसूल प्रशासनाबरोबर पत्रकार देखील जीवावर उदार होऊन सेवा करत असून शासनाने सर्व पत्रकारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या सोशल मीडिया सेलच्या वतीने लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
पत्रकारांना शासनाचे कोणतेही मानधन नाही असे असताना डॉक्टर,पोलीस व महसूल प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार आपली सेवा बजावत आहे दुष्काळ असो की महापूर व निवडणुका असो की साथीचा प्रकोप पत्रकार आपली सेवा बजावत असतात व आपला जीव धोक्यात घालून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत असतात.
आपल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पूढे म्हटले की पत्रकारांना शासनाचे कोणतेही मानधन नाही असे असताना डॉक्टर,पोलीस व महसूल प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार आपली सेवा बजावत आहे दुष्काळ असो की महापूर व निवडणुका असो की साथीचा प्रकोप पत्रकार आपली सेवा बजावत असतात व आपला जीव धोक्यात घालून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत असतात एका बाजूला प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कौतुक करायचे काम होत असते मात्र पत्रकारांना या कामाचा मोबदला म्हणून जाहिराती मधून थोडे फार कमिशन मिळत असते मात्र साथीच्या प्रकोपामुळे सध्या सर्वच मार्केटिंग बंद असून कोणती ही जाहिरात मिळत नाही असे असून देखील पत्रकार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले सेवेचे व्रत सूरु ठेवत आहे त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील पत्रकार यांची अत्यन्त हाल होत आहे सरकार विविध क्षेत्रातील जनतेस सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे मात्र पत्रकार बांधवांचा विचार करून आर्थिक सहकार्य करावे असेही त्यांनी आपल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे