आरोग्य
…यांचे महावितरण कर्मचाऱ्यांना आरोग्य साहित्य वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असताना या साथीत आपल्या प्राणांचे मोल पणाला लावणाऱ्या महावितरण व पत्रकार यांची समाजाला मोठी मदत मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील वकील संघाचे सदस्य अड्.योगेश खालकर यांनी त्यांना वैद्यकीय साहित्याचे नुकतेच वाटप केले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतात करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की १४ एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी १४ तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ४८० तर १६७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात १ हजार ७८ जणांना लागण झाली असून ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.लागण झालेल्यात नगर जिल्ह्यातील २६ जणांचा समावेश आहे.त्यामुळे नागरिकांत या साथीचे भय निर्माण झाले आहे.तरीही नागरिकांना या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर,परिचारिका,महावितरण कंपनीचे कर्मचारी,पत्रकार अत्यावश्यक सेवांची साखळी अखंड ठेवणारे वाहतूक विभागातील चालक आदी महत्वपूर्ण योगदान देत आहे.याची दाखल घेऊन कोपरगाव वकील संघाचे सदस्य व निळवंडे कालवा कृती समितीचे सक्रिय कार्यकर्ते अड्.योगेश खालकर यांनी कोपरगाव शहरातील पत्रकार व महावितरण कंपनीचे कर्मचारी यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर, व तोंडाला बांधण्यासाठी मास्कचे मोफत वितरण केले आहे.
सदर प्रसंगी अड्.राहुल वाकचौरे, नितीन साबळे, लक्ष्मण सताळें आदी मान्यवर उपस्थित होते.अड्.योगेश खालकर यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.