जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या माजी आमदारांच्या वाढदिवसानिमित वृक्षारोपन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

शासकीय जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात.पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ,गुलमोहोर,निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली.या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत.हि बाब लक्षात आल्याने त्यात बदल केला आहे.

कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या आहेत.आता वृक्षलागवड हि स्थानिक वृक्षांची केली जात आहे.अशीच वृक्ष लागवड माजी आ.काळे यांच्या वाढदिवसा निमित्त करण्यात आली आहे.निसर्गाचा बिघडलेला समतोल वेळीच सावरला गेला नाही तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.त्याची प्रचीती यावर्षीच्या उन्हाळ्यात आली असून १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना म्हणून २०२२ मधील मार्च महिन्याची नोंद करण्यात आली आहे.पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यामुळे वृक्षारोपण व त्याचे संगोपन हा निसर्गाचा बिघडलेला समतोल सावरण्यासाठी योग्य पर्याय आहे.

त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भगवान विष्णू मंदिर व कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान व कारखाना परिसरात जवळपास २५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी दिली आहे. यावेळी माजी आ.काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी केली होती.

या प्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बी.बी.सय्यद,असि.सेक्रेटरी एस.डी.शिरसाठ,फॅक्टरी मॅनेजर दौलतराव चव्हाण,चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे,चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे,फायनान्स मॅनजर सोमनाथ बोरनारे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी बहू संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close