जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ऊस जाळून खाक,अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी शिवारातील गट नं.२५१मधील पावणे दोन एकर क्षेत्रातील ऊस अज्ञात व्यक्तिने पेटवून दिल्याने शेतकर्‍याची सुमारे दोन लाखाची नुकसान झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मळेगाव थडी येथील शेतकरी योगेश नामदेव दवंगे यांनी पाच एकर ऊसाची लागवड केली होती. सदरचा ऊस हा काढणीला आलेला असतांना अज्ञात व्यक्तिने सदर ऊसात रॉकेट सारखा फटाका पेटवून टाकल्याने सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक केला आहे.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,”मळेगाव थडी येथील गट नं.२५१ हा शेतकरी योगेश नामदेव दवंगे यांचे मालकीचा आहे सदर क्षेत्रात त्यांनी पाच एकर ऊसाची लागवड केली होती. सदरचा ऊस हा काढणीला आलेला असतांना अज्ञात व्यक्तिने सदर ऊसात रॉकेट सारखा फटाका पेटवून टाकल्याने सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक केला आहे त्यामुळे या शेतकर्‍याची दोन लाखाची नुकसान झाली आहे.

   सदरचे कृत्य हे पूर्ववैमनस्यातून झाले असून दवंगे व शेजारील व्यक्तिंमध्ये केसेस कोर्टात प्रलंबित आहे त्याचा राग आपल्याने वरील गैरकृत्य केल्याचा संशय फिर्यादी योगेश नामदेव दवंगे यांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणी कोपरगांव ग्रामिण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हयाची नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.संदीप बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close