जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

डॉ.पहाडे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


संवत्सर -(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावचे रहिवासी असलेले सध्या कोपरगाव  डॉ.प्रकाश हुकुमचंद पहाडे(वय -72)यांचे शनिवार 3 ऑगस्ट 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,दोन बहिणी,पत्नी,दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.

   

डॉक्टर पहाडे यांचे हॉस्पिटल संजीवनी सहकारी साखर कारखान्या जवळ होते.डॉ.पहाडे यांनी चाळीस वर्षापूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायात सुरुवात केली होती.त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्याचे काम करत असत.हे प्रगतिशील शेतकरी असून संवत्सर गावात त्यांची बागायती जमीन आहे.त्यांनी हा सर्व प्रपंचाचा गाडा सुरू असतानाच आज त्यांची प्राण ज्योत मालवली आहे.सहकारातील नेते स्व.नामदेव परजणे पाटील यांचे ते फॅमिली डॉक्टर होते.त्यांचा अंत्यविधी कोपरगाव अमरधाम या ठिकाणी शनिवार दुपारी दोन वाजता आहे.शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.

स्व.डॉ.पहाडे हे अत्यंत विनयशील स्वभावाने कोपरगाव आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या जाण्याने कोपरगाव आणि परिसरात दुःखाची छाया पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल नामदेवराव पाटील परजणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close