जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा अधिकाऱ्यांची स्थळ पाहणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
    कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील दुष्काळी व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात असलेले जवळके,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादराबाद,शहापूर आदी ग्रामपंचायत हद्दीत असलेले पाझर तलाव भरण्याबाबत आज जवळके-धोंडेवाडी येथील हनुमान मंदिरात परिसरातील निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकारी,शेतकरी,ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली असून आज संबंधित पाणी सोडण्याच्या ठिकाणांची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली आहे.

  

सदर बैठकीनंतर जलसंपदा विभागाचे अभियंता संदीप साबळे यांचेसह निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते,विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शेतकरी आदींनी धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर,अंजनापूर,बहादराबाद,सायाळे,मलढोण आदी गावातील पाझर तलावात संभावित पाणी सोडण्याची ठिकाणांची पाहणी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी निवडणुका पाहून स्थानिक नेत्याच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२६ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणासह विविध संस्थाच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न केले होते.मात्र यातील उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० तर उजवा कालवा २५ टक्के,वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.उजव्या कालव्याचे राहुरी तालुक्यात भूसंपादन अद्याप बाकी आहे.एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून सुद्धा या ५३ वर्ष प्रलंबित प्रकल्पाचे कामाचे लोकार्पण करण्याचा प्रस्थापित नेत्यांनी आगामी लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका पाहून षडयंत्र आखले असून त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचे पडसात दुष्काळी भागात तीव्र स्वरूपात उमटले आहे.अद्याप उजवा कालवा पूर्ण झालेला नाही.तर डाव्या कालव्यात गत १४ ऑक्टोबर रोजी पाणी सोडून व एक टी.एम.सी.पाणी खर्ची पडले आहे.राहाता व संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यात आले आहे.उर्वरित पाणी पुन्हा एका प्रवरा पात्रात जात आहे.मात्र सव्वा महिना उलटला तरी कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात एक थेंब पाणी आलेले नाही.त्यासाठी कोपरगाव,श्रीरामपूर,सिन्नर तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती कमी पडली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात दुष्काळाचा सामना कसा करायचा,पिण्याच्या पाण्याबरोबर,आपले पशुधन कसे वाचवायचे असे गंभीर प्रश्न निर्माण तालुका प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाचे पडसात उमटले आहे या पाण्यावरून संगमनेर तालुक्यातील वडझरी येथे या पाण्यावरून शेतकऱ्यांत हाणामाऱ्या झाल्या असून एकमेकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.संगमनेर येथे जलसंपदा विभागासमोर निळवंडे कालवा कृती समितीने तर करुले संगमनेर येथे पाणी येत नसल्याने दुष्काळी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते.रांजणगाव देशमुख येथेही काही नागरिकांनी उपोषण करून त्याकडे लक्ष वेधून घेतले होते.त्यात जलसंपदा विभागाने पाझर तलाव भरण्याचे आश्वासन दिले आहे.तथापि अद्याप त्याबाबत शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक प्रांताधिकारी माणिक आहेर,जलसंपदा विभागाचे उपअभियंता महेश गायकवाड,संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे,कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,पोलीस अधिकारी सोपान शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न होऊनही कार्यवाही सुरु झालेली नाही.

संगमनेर तालुक्यातील खोकडविहीर येथील स्थळ पाहणी करताना निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.


   दरम्यान याबाबत शिर्डी येथील बैठकीत पाणी सोडण्याबाबत बैठकीच्या अंतिम चरणात चर्चा झाली आहे.मात्र धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापुर आदी ठिकाणच्या तलावात पाणी कसे सोडायचे या बाबत अंतिम कार्यवाहीचे स्वरूप निश्चित झालेले नाही या पार्श्वभूमीवर आज हि बैठक आयोजित केली होती.

संगमनेर व कोपरगाव तालुका सिमा रेषेवर कालव्याच्या पुंच्छ भागात स्थळ पाहणी करताना कार्यकर्ते दिसत आहे.

   दरम्यान आज धोंडेवाडी येथील हनुमान मंदिरात निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,तानाजी शिंदे,बाळासाहेब सोनवणे,यशवंत गव्हाणे,बहादराबादचे माजी सरपंच विक्रम पाचोरे यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.

   त्यावेळी जेष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद गाढे,भिवराज शिंदे,विजय शिंदे,किसान पाडेकर,माजी उपसरपंच विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माणिक दिघे,ज्ञानदेव नेहे,रावसाहेब मासाळ,साहेबराव रहाणे,दगडू पा.रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,सोपान थोरात,रंगनाथ गव्हाणे,सोपान रहाणे,अनिल खालकर,वाल्मिक नेहे,नानासाहेब नेहे,अड्.आर.सी.गव्हाणे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

   सदर प्रसंगी प्रास्तविक गंगाधर रहाणे यांनी केले असून पत्रकार नानासाहेब जवरे,जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब गव्हाणे,कैलास गव्हाणे,माजी सरपंच विक्रम पाचोरे,माणिक दिघे,अड्.आर.सी.गव्हाणे,सुभाष रहाणे,तानाजी शिंदे सर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

   सदर बैठकीनंतर जलसंपदा विभागाचे अभियंता संदीप साबळे यांचेसह निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते,विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शेतकरी आदींनी धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर,अंजनापूर,बहादराबाद,सायाळे,मलढोण आदी गावातील पाझर तलावात संभावित पाणी सोडण्याची ठिकाणांची पाहणी केली आहे.मात्र यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची गैरहजेरी अनेकांना जाणवली असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपस्थितांचे आभार तानाजी शिंदे सर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close