सहकार
…या गावाने प्रामाणिक सहकार जपला-रोढे महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे नं 2 सेवा सोसायटीची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि 15 वा आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नेवासा येथील रामकृष्णाश्रमाचे प्रमुख ह.भ.प.निलेश महाराज रोढे यांचे प्रमुख उपस्थितीत व कोपरगाव येथील ओम शांती ध्यान केंद्र‘च्या प्रमुख ब्रम्हकुमारी सरला दीदी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे नं 2 सेवा सोसायटी ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून संस्था आपल्या एकूण सभासदांपैकी निकषाद्वारे निवड करून आदर्श सभासद पुरस्कार देते.ज्यात सन्मानचिन्ह आणि रोख 1हजार 111 रुपये मात्र दिले जातात.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या भोजडे येथील नं 2 सेवा सोसायटीची 27 वी वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाल आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद सिनगर होते.

सदर प्रसंगी शिवसेनेचे बाळासाहेब पवार,सचिन मालिक आणि ज्ञानेश्वर कपिले,भोजडे सोसायटी 1 चे अध्यक्ष रंगनाथ सीनगर,लोकनियुक्त सरपंच सुधाकर वादे,तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी सीनगर,प्रगतीशील शेतकरी अनंत सीनगर,उपसरपंच दिलीप सीनगर,धोत्रा येथील विष्णू पाडेकर,रवंदा येथील तान्हाजी लामखडे,साईभक्त सागर करडे,संतोष सीनगर,विजय सीनगर,शहाराम सीनगर,सुधाकर सीनगर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर होते.

यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर सिनगर,संचालक ज्ञानेश्वर सिनगर,अशोक मंचरे,रामनाथ चंदणे,दिपक धट,रावसाहेब सिनगर,फकीरचंद जेऊघाले,राजेंद्र घनघाव आदींनी परिश्रम घेतले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेश बारहाते यांनी केले आहे तर सूत्रसंचालन सागर करडे यांनी केले आहे तर शेवटी उपस्थितांचे आभार गोरक्षनाथ गलांडे यांनी मानले आहे.



