जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

मयत कामगाराच्या वारसास ३.२० लाखाचा धनादेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते ३ लाख २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्त करण्यात आला आहे.

जनता सामुहीक विमा पॉलिसीच्या माध्यमातून अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना रु.८० हजार दवाखाना खर्चासाठी दिले जातात व कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.३ लाख २० हजार नुकसान भरपाई दिली जाते.कर्मवीर काळे कारखान्याच्या मयत कर्मचाऱ्याच्या वारस पत्नीस नुकसान भरपाई धनादेश देतांना कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचेसह मान्यवर उपस्थित दिसत आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विभागाचे हंगामी कायम कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचा १३ एप्रिल २०२३ रोजी अ.नगर येथे जात असतांना निंबळक बायपास अ.नगर येथे अपघात होवून त्यांच्यावर साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,शिर्डी येथे उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले होते.कारखान्याचे अध्यक्ष आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने कारखान्यातील सर्व कायम,हंगामी (कायम),हंगामी (टेंपररी) व दैनिक वेतनावरील हजेरी पत्रकावरील सर्व कामगारांचा दि.ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि.शाखा कोपरगाव यांचेकडे अपघाती विमा घेतलेला आहे.त्यानुसार दुर्दैवाने कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास मयत कामगारांच्या वारसांना आर्थिक अडचण जाणवू नये या उद्देशातून अपघाती विमा घेतलेला आहे.

जनता सामुहीक विमा पॉलिसीच्या माध्यमातून अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना रु.८० हजार दवाखाना खर्चासाठी दिले जातात व कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.३ लाख २० हजार नुकसान भरपाई दिली जाते.मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याबाबत कारखाना प्रशासनाने सदर विमा कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.कंपनीने सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांच्या वारसांना विमा पॉलिसिपोटी ३ लाख २० हजार रुपयांची नुकसान भरपाई विमा रक्कम मंजूर केली होती.सदरच्या ३ लाख २० हजार रक्कमेचा धनादेश नुकताच मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांच्या वारस पत्नी श्रीम.अलका यशवंत हाळनोर यांना कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद,असि.सेक्रेटरी संतोष शिरसाठ, लेबर ऑफिसर सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

कर्मवीर काळे कारखान्याच्या मयत कर्मचाऱ्याच्या वारस पत्नीस नुकसान भरपाई धनादेश देतांना कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close