जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

…या शहरात विना दणदणाट गणेशाला निरोप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर आणि तालुक्यात पहिल्यांदाच नियंत्रित डी.जे.विद्येचे दैवत असलेल्या गणेशाला निरोप दिला गेला असून याबाबत प्रशासन आणि पोलिसांचे कौतुक होत आहे.मात्र यावेळी दणदणाटाला निरोप मिळाल्याने रुग्ण,लहान मुले वृद्धांनी सुटकेचा निःश्वास टाकला असल्याचे दिसून आले आहे.शेवटच्या गणेशाला रात्री 11.30 वाजता भावपूर्ण निरोप देण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील चौकात गणेश मंडळे आपले ढोल पथके कला सादर करताना दिसत आहे.

“आपण नगराध्यक्ष असतांना पाच वर्षे -गणेश विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात एकही गणेश मूर्ती उघड्यावर पडू दिली नाही व त्यांची विटंबना होऊ दिली नाही.कोपरगाव शहरात १६ ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीत कृत्रिम तलाव उभे करून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करून त्याच तलावात विसर्जन करून घेतले,नंतर सर्व मूर्तीचे नदीपात्रात विधिवत विसर्जन करण्यात आले होते.मात्र यावर्षी मात्र गोदापात्रात अनेक मूर्ती भग्न अवस्थेत उघड्यावर पडलेल्या आढळल्या आहेत हे मोठे दुर्दैव आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

   गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि कर्णकर्कश आवाजावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि ध्वनिप्रदूषण नियमांनुसार कठोर कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत.गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे,लेझर व फटाक्यांच्या वापराबाबत न्यायालयाचे व प्रशासनाचे कडक नियम लागू आहेत.डीजेच्या ऐवजी ढोल-ताशा पथके,लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि भजन-कीर्तनासह विसर्जन मिरवणुका काढण्यावर भर दिला जात आहे.नियम मोडणाऱ्या आणि डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर व डीजे मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे.त्यामुळे गणेश मंडळांना चांगलाच चाप बसला असल्याचे दिसून आले आहे.त्याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली होती.उत्तरत्तर त्यात वाढ होत गेली होती.सायंकाळी ७.१५ वाजता महात्मा गांधी चौकाचे पुढे शांतता आढळून आली आहे.नरसिंह प्रतिष्ठान,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,माता वैष्णोदेवी ग्रुप,शुक्लेश्वर तरुण मंडळ उत्सव समिती बेट कोपरगाव,क्रांती युवक संघटना,कोर्ट रोड,मुंबादेवी तरुण मंडळ,सायंकाळी ७.३० वाजता तहसील कचेरी चौकात छत्रपती शिवराय तरुण मंडळ,छत्रपती संभाजी महाराज चौक,राजमुद्रा प्रतिष्ठान,गोरोबानगर,साई प्रतिष्ठान निवारा,श्री अमरेश्वर प्रतिष्ठान,छत्रपती प्रतिष्ठान,गोखरू गल्ली,हिंदू वाडा मंडळ,एस.ए.फाऊंडेशन मंडळ,संजय नगर,छत्रपती संभाजी महाराज चौक श्री गणेश उत्सव मंडळ,जय तुळजाभवानी तरुण मंडळ आदी मंडळाचे गणपती वाजत जगात पुढे सरकताना दिसून आले आहे.तर त्यांच्या स्वागतासाठी विघ्नेश्वर चौकात उशिराने विधान परिषद आ.विवेक कोल्हे यांनी हजेरी लावली होती.तर प्रथमपासूनच नगराध्यक्ष पराग संधान,त्यांचे सहकारी माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर,माजी नगरसेवक बबलू वाणी,प्रशांत कडू,आकाश वाजे,मुख्याधिकारी अजित निकत,संदीप देवकर,महिला नगरसेविका आदींनी हजेरी लावली होती.

कोपरगाव येथील विघ्नेश्वर चौकात शहरातून आलेल्या गणेश मंडळाचे स्वागत करताना आणि त्यांचे ढोल पथकाची कसरत पाहताना नगराध्यक्ष पराग संधान व त्यांचे सहकारी दिसत आहेत.

दरम्यान यावेळी कोपरगांव येथील सूर्यतेज संस्थेने श्री गणेश सार्वजनिक उत्सव निमित्ताने प्रबोधनाचा “कुंभमेळा”  देखावा साकारला असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी त्र्यंबकेश्वर -नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा पुर्व तयारी सुरु असल्याचे पार्श्वभूमीवर गोदावरी नदी तीरावर वसलेल्या अनेक गावातही सिंहस्थ पर्वणी निमित्ताने गोदावरी नदी पात्रात स्नान पर्वणी साधतात.या पवित्र कार्यकाळात समाजप्रबोधन ही काळाची गरज ओळखून प्रबोधनाचा “कुंभमेळा”  देखावा साकारला असल्याचं दिसून आले आहे.

   दरम्यान यावेळी कोपरगाव शहरात शेवटच्या दिवशी एकूण 23 मंडळानी आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला आहे.शेवटचा गणपतीला रात्री 11.30 वाजता निरोप देण्यात आला आहे.त्यासाठी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,चार पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचारी असे एकूण 110 अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

  दरम्यान यावेळी उच्च न्यायालयाचे आदेशाचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंडळांना अधिक कल्पना दिली असल्याचे कोणीही त्याचे उल्लंघन केले असल्याचे दिसून आले नाही.यावेळी डिजे धारकांना केवळ बेस आणि टॉप असे दोनच पर्याय देण्यात आले होते.त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा करण्यात येणार असल्याची तंबी दिली होती.त्यामुळे सर्वांनी आपल्या मर्यादेत राहण्याचे पसंत केले असल्याचे दिसून आले आहे.एरव्ही दिजेने प्रत्येक गणेशोत्सवात आपली जोरदार हजेरी दिली असल्याने सामान्य जनतेने ते गृहीत धरले होते.मात्र यावेळी किमान आवाज असल्याने गणेशोत्सवात एक मिळमिळीतपणा आढळून आला असल्याचे गणेश मंडळानी आणि कार्यकर्त्यांनी कबूल केले आहे.

यावेळी उच्च न्यायालयाचे आदेशाचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंडळांना अधिक कल्पना दिली असल्याचे कोणीही त्याचे उल्लंघन केले असल्याचे दिसून आले नाही.यावेळी डिजे धारकांना केवळ बेस आणि टॉप असे दोनच पर्याय देण्यात आले होते.त्याचे उल्लंघन न करण्याची तंबी दिली होती.त्यासह वेळचे पालन करण्यास भाग पडताना पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी संदीप सोन्ने व त्यांचे सहकारी दिसत आहेत.

   दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीतही आपल्या लाडक्या गणेशाला विविध मंडळानी भावपूर्ण निरोप दिला आहे.शेवटचा गणपती विसर्जन रात्री 11 वाजता संपन्न झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.त्यासाठी तालुका हद्दीत एक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,दोन पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास 53 अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कोठेही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे पोलिसांनी आणि गणेशमंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगांव येथील सूर्यतेज संस्थेने श्री गणेश सार्वजनिक उत्सव निमित्ताने प्रबोधनाचा “कुंभमेळा”  देखावा साकारला असल्याचे दिसून आले आहे.

  दरम्यान यावेळी कोपरगांव येथील सूर्यतेज संस्थेने श्री गणेश सार्वजनिक उत्सव निमित्ताने प्रबोधनाचा “कुंभमेळा”  देखावा साकारला असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी त्र्यंबकेश्वर -नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा पुर्व तयारी सुरु असल्याचे पार्श्वभूमीवर गोदावरी नदी तीरावर वसलेल्या अनेक गावातही सिंहस्थ पर्वणी निमित्ताने गोदावरी नदी पात्रात स्नान पर्वणी साधतात.या पवित्र कार्यकाळात समाजप्रबोधन ही काळाची गरज ओळखून प्रबोधनाचा “कुंभमेळा”  देखावा साकारला असल्याचं दिसून आले आहे.कोपरगांव ही देव-दानवांची नगरी पौराणिक ग्रंथात आहे.देव-दानवांनी समुद्र मंथन केल्यावर त्यातून बाहेर आलेले हलाहल (विष) देवाधिदेव महादेव यांनी प्राषाण केले…तर अमृत हे देव-दानवांच्या ओढा-ओढीत चार ठिकाणी सांडले.त्यात त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे हे ठिकाण मानले आहे.गोदावरी नदी प्रवाहीत झालेल्या किनाऱ्यावरील गावांना विशेष महत्व आहे.कोपरगांव गुरु शुक्राचार्य यांचे स्थान म्हणून ओळखले जाते.हा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत होता.

कोपरगाव नगरपरिषद आणि पोलिस यंत्रणा यांनी आपत्काळात काही दुर्घटना नको म्हणून रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती त्याचे छायाचित्र.

  दरम्यान आपण नगराध्यक्ष असतांना पाच वर्षे -गणेश विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात एकही गणेश मूर्ती उघड्यावर पडू दिली नाही व त्यांची विटंबना होऊ दिली नाही.कोपरगाव शहरात १६ ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीत कृत्रिम तलाव उभे करून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करून त्याच तलावात विसर्जन करून घेतले,नंतर सर्व मूर्तीचे नदीपात्रात विधिवत विसर्जन करण्यात आले होते.मात्र यावर्षी मात्र गोदापात्रात अनेक मूर्ती भग्न अवस्थेत उघड्यावर पडलेल्या आढळल्या आहेत हे मोठे दुर्दैव आहे”- विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close