जाहिरात-9423439946
रेल्वे सेवा

…या तालुक्यातील रेल्वे भुयारी मार्ग मंजूर -माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील हनुमानवाडी परिसरात पादचारी नागरिक,विद्यार्थी व स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाच्या (सबवे) बांधकामास मान्यता देण्यात आली आहे.याबाबत पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार पाठक यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना लेखी पत्राद्वारे उत्तर कळविले आहे.त्यामुळे कान्हेगाव,वारी आदी गावातील ग्रामस्थानी या मान्यतेचे स्वागत करून खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे आभार मानले आहे.

  संकल्पित भुयारी मार्ग.

“दरम्यान या भुयारी मार्गाचा नजीकच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी,वृद्धः नागरिक आणि शेतकरी यांना मोठा फायदा होणार आहे.रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सबवेसाठी आवश्यक असलेले जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जीएडी) सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.ही मंजुरी मिळताच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

   महाराष्ट्रातील रेल्वेचे भुयारी मार्ग लोकलचा ताण कमी करण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.हे भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुलभता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने त्यावर मोठा भर दिला आहे.त्यामुळे वाहतूक खोळंबा होण्यापासून बचाव होत असून प्रवाशांची सुरक्षा हा घटक महत्वाचा आणि यशस्वी ठरत आहे.त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात खा.वाकचौरे यांनी यावर भर दिला आहे.त्यासाठी त्यांनी कान्हेगाव येथील भुयारी मार्गाचा गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली दरबारी पाठपुरावा करत होते.कान्हेगाव व कोपरगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे किमी ४५०/४-५ या ठिकाणी हा पादचारी भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असून रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे.

   दरम्यान या भुयारी मार्गाचा नजीकच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी,वृद्धः नागरिक आणि शेतकरी यांना मोठा फायदा होणार आहे.रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सबवेसाठी आवश्यक असलेले जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जीएडी) सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.ही मंजुरी मिळताच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

   दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुणे विभागाचे रेल्वे अधिकारी,कोपरगाव तहसीलदार आणि रेल्वे मार्गालगतचे रहिवाशी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तहसील कार्यालयात लावली होती.त्याचीही दखल घेऊन प्रवासी व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक जागा खुल्या करून उर्वरित दौंड-मनमाड आहे.रेल्वे विभागात कुंपण घालण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.या उपाययोजनांमुळे अनधिकृत रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या दुर्घटना कमी होतील,असा विश्वास खा.वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.

   यामुळे कान्हेगाव भोजडे ग्रामस्थांना अधिक फायदा होणार असून भोजडे विकास सोसायटीचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर यांनी खा.वाकचौरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.यावेळी सतत पाठपुरावा करणारे कान्हेगाव-वारी येथील शिवसेनेचे नेते गोरख टेके,तान्हाजी थोरमिसे,तालुका संघटक अशोक कानडे,प्रशांत टेके,कार्यकर्ते अशोक आप्पा काजळे यांच्यासह स्थानिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close