जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगावातील ‘त्या’आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या ब्रिजलाल नगर येथील आरोपीने त्याच भागातील शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीवर मागील पाच ते सहा महिण्यापासून शिर्डी येथील राज लॉज येथे तिच्या मनाविरुद्ध अत्याचार करून तिच्यावर जातीवाचक टिपणी केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी अटक केलेला आरोपी आज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायदंडाधिकारीं न्या.सयाजी कोराळे यांचे समोर हजर केला असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आज पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.कोराळे यांचे समोर शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी त्यास हजर केले असता दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरंगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील रहिवासी असून त्याच भागातील आरोपी असलेला तरुणाने तिला आपल्या मारुती स्विफ्ट या कार (क्रं.एम.एच.१२ जे.यू.९२११) मधून शिर्डी व इतर ठिकाणी नेऊन त्या त्या ठिकाणी वेळोवेळी नेऊन तेथील राज लॉज येथे नेऊन तिचे मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन तिच्यावर जातीवाचक शिक्कामारून तिच्या जातीचा तिच्या वर्तनाशी संबध जोडून उल्लेख करून,”तिने कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी” दिली होती.त्यामुळे हे प्रकरण वाढले होते.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१४/२०२२ भा.द.वि.कलम ३७६,५०६,पोक्सो कायदा कलम ४,८,१२ तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१) आर.एस.डब्ल्यू.प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.दरम्यान या आरोपीस कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले होते.
दरम्यान आज पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.कोराळे यांचे समोर शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी त्यास हजर केले असता दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close