धार्मिक
कोपरगाव तालुक्यातील साई भक्तांना गावकरी गेटने दर्शन द्या-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील साई भक्तांना गावकरी गेटने दर्शन सुविधा मिळावी अशी महत्वपूर्ण मागणी जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ आज शिर्डी येथे केली असल्याची माहिती मिळाली आहे.
“शिर्डीसह कोपरगाव येथील व नजीकच्या साई भक्तांना गर्दी असल्याने दर्शनासाठी मोठा वेळ व मानसिक त्रास सहन करावा लागतो तो वेळ वाचवून शिर्डी परिसरातील साई भक्तांना त्वरित दर्शन मिळण्याची गरज आहे”-निलेश धुमाळ,भंडारा गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख.
शिर्डी येथील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक आज दुपारी संपन्न झाली आहे.त्यावेळी संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे ,उपाध्यक्ष उपाध्यक्ष अॕड.जगदीश सावंत,व विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,राहुल कनाल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्यावेळी या मागणीचे निवेदनाद्वारे श्री.साईबाबा संस्थान शिर्डी चे उपाध्यक्ष अॕड.जगदीश सावंत व विश्वस्त राहुल कनाल यांना भंडारा गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात कोपरगाव चे श्री. साईबाबांच्या जीवनातील महत्व स्पष्ट करतानाचे दाखले दिले आहेत. सदर निवेदन देताना जिल्हा संपर्कप्रमुख भंडारा व गोंदिया निलेश धुमाळ यांच्या सोबत शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख मनोज कपोते, बालाजी गोर्डे,ज्ञानेश कपिले हे सर्व उपस्थित होते. यावेळी कोपरगाव तालुक्यातील साईभक्तांसाठी जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अड. जगदीश सावंत व राहुल कनाल यांनी श्री.साईबाबा विश्वस्त मंडळ प्रयत्नशील राहील ह्याची ग्वाही दिल्याची माहिती हाती आली आहे.