जाहिरात-9423439946
निवड

…यांचा कृषी क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रीय सन्मान !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  अश्वमेध अग्रोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समर्थ वाघचौरे यांना भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅग्रीकल्चरली इम्पॉर्टंट मायक्रोऑर्गॅनिझम्स यांच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अश्वमेध अग्रोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समर्थ वाघचौरे सत्कार स्वीकारतानाचा क्षण.

समर्थ वाघचौरे यांनी सन-2023 मध्ये श्रीलंकेत निर्माण झालेल्या कृषी संकटाच्या काळात त्यांनी तेथे पहिले बायोफर्टिलायझर उपलब्ध करून देत शेतकऱ्यांचे उपजीविकेचे संरक्षण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  कोपरगाव येथील समर्थ वाघचौरे यांनी बायोफर्टिलायझरच्या प्रभावी फील्ड अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे ते “शेतकऱ्यांचा मित्र” म्हणून ओळखले जातात.सन-2023 मध्ये श्रीलंकेत निर्माण झालेल्या कृषी संकटाच्या काळात त्यांनी तेथे पहिले बायोफर्टिलायझर उपलब्ध करून देत शेतकऱ्यांचे उपजीविकेचे संरक्षण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  वर्तमानात भारतात मातीची सुपीकता आणि शाश्वत शेती ही मोठी आव्हाने असताना वाघचौरे यांनी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या सोबत काम करत आहेत आणि भारतीय शेतीचे भविष्य घडविण्यासाठी योगदान देत आहेत.आय.सी.ए.आर.-एन.बी.ए.आय.एम.चे संचालक डॉ.अशोक श्रीवास्तव आणि त्यांच्या टीमतर्फे हा सन्मान प्रदान करण्यात आला असून,यामागील उद्देश शाश्वत शेतीसाठी कार्य करणाऱ्या तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे हा असल्याची माहिती आहे.

अश्वमेध कडून समर्थ वाघचौरे यांचे यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच अम्मा असोसिएशनचे अध्यक्ष व अश्वमेधचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close