जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

सहाय्यक औषध आयुक्तपदी …यांची निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     कोपरगावचे रहिवासी असलेले सतीश भाऊसाहेब सांगळे यांनी सहाय्यक औषध आयुक्त या पदासाठी एमपीएससी मार्फत नुकतीचनिवड झाली आहे.त्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सत्कार केला आहे.

सत्कार प्रसंगी बिपीन कोल्हे,विवेक कोल्हे व त्यांचे सहकारी दिसत आहेत.

  

सतीश सांगळे यांची सन-२०१६ मध्ये यूपीएससी आयोगामार्फत ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून गेल्या आठ वर्षांपासून ते दिल्ली येथे कार्यरत आहेत.नुकतीच एमपीएससी आयोगामार्फत सहायक औषध आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”सतीश सांगळे यांनी रवंदा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले.पुढे त्यांनी बारामती येथील एस.व्ही.पी.एम.महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे त्यांना ऑल इंडिया १७ वा क्रमांक मिळाला आहे.येथे त्यांनी फार्मास्युटिक्स विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.पुढे मोहाली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांची डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीज,हैदराबाद येथे कॅम्पस प्लेसमेंट झाली आहे.तेथे त्यांनी दोन वर्षे रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम केले.सन-२०१६ मध्ये यूपीएससी आयोगामार्फत ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून गेल्या आठ वर्षांपासून ते दिल्ली येथे कार्यरत आहेत.नुकतीच एमपीएससी आयोगामार्फत सहायक औषध आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

   दरम्यान सांगळे हे गेली आठ वर्षांपासून ते दिल्ली येथे कार्यरत आहेत.नुकतीच एमपीएससी आयोगामार्फत सहायक औषध आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सत्कार प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,भाऊसाहेब सांगळे,प्रकाश सांगळे,देविदास दौंड,राजेंद्र सांगळे,अमोल दौंड,राहुल सांगळे तसेच साखर कारखान्याचे सर्व संचालक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close