जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

पत्रकार कुताळ यांना दर्पण पुरस्कार जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


श्रीरामपूर पत्रकार संघाचे सदस्य व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या ३२ वा राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पत्रकार नवनाथ कुताळ यांनी या आधी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस पद भूषवले आहे.शिवाय शिर्डीत तीन राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन घेण्यात मोठी भूमिका निभावली आहे.

   शुक्रवार दि.१६ रोजी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी,पोंभुर्ले ग्रामपंचायत,जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ,जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७८ व्या पुण्यतिथीनिमित्त पोंभुर्ले,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.दरम्यान आगामी दि.६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी सदर पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे.

   पत्रकार नवनाथ कुताळ यांनी या आधी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस पद भूषवले आहे.शिवाय शिर्डीत तीन राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन घेण्यात मोठी भूमिका निभावली आहे.त्यांच्या या निवडीचे निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक व पत्रकार नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close