निवडणूक
ग्रामपंचायत पोट निवडणुक संपन्न…हा गट वरचढ !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पार पडलेल्या धोत्रे व दहेगाव बोलका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन्हीही सदस्य आ.आशुतोष काळे गटाचेच निवडून आले असून तत्पूर्वी तीन पैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते.त्यामुळे एकूण पाच सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत चार सदस्य काळे गटाचे निवडून आल्यामुळे या पोट निवडणुकीत काळे गटाचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले.नूतन सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शिंगणापूर,चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे चांदेकसारे पोटनिवडणुकीत काळे गटाचे अमोल विठ्ठल माळी व शिंगणापूर पोटनिवडणुकीत काळे गटाच्या मोनाली साईनाथ जाधव यांची बिनविरोध निवड होवून काळे गटाचे दोन उमेदवार तर कोल्हे गटाचा शिंगणापूरमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता.
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर,चांदेकसारे,धोत्रे आणि दहिगाव बोलका या चार ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण पाच जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.परंतु शिंगणापूर,चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे चांदेकसारे पोटनिवडणुकीत काळे गटाचे अमोल विठ्ठल माळी व शिंगणापूर पोटनिवडणुकीत काळे गटाच्या मोनाली साईनाथ जाधव यांची बिनविरोध निवड होवून काळे गटाचे दोन उमेदवार तर कोल्हे गटाचा शिंगणापूरमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता.तर धोत्रे आणि दहिगाव बोलका या दोन ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार दि.२८ रोजी पार पडून बुधवार दि.२९एप्रिल रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत धोत्रे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माया किरण माळवदे व दहिगाव बोलका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनुमती नानासाहेब डोंगरे या काळे गटाच्या दोन्ही उमेदवार निवडून येवून कोल्हे गटाला अपयश आले आहे.या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.



