जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पत्रकार शेळके यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील रहिवासी व कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब शेळके यांच्या मातोश्री पार्वताबाई सखाराम शेळके (वय-७६) यांचे नुकतेच मंगळवारी पहाटे ५ वाजता निधन झाले आहे.आडगाव बु. येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,चार मुली,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता.प्रगतिशील शेतकरी सखाराम शेळके यांच्या त्या पत्नी तर वसंत शेळके,कैलास शेळके व सार्वमतचे उपसंपादक नानासाहेब शेळके यांच्या त्या मातोश्री होत्या.

त्यांच्या निधनाबद्दल माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,भारत संचार निगमचे संचालक रवींद्र बोरावके,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,नानासाहेब गाढवे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close