आरोग्य
पालकमंत्र्यांचा उद्या सकाळी कोपरगाव दौरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असून आजपर्यंत ७४ नागरिकांचा बळी गेला असून दररोज शेकडो नागरीक कोरोना साथीचे बळी जात आहे.या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ हे जुहू विमानतळ येथून शिर्डी येथील विमानतळावर सकाळी नऊ वाजता खाजगी विमानाने येत असून ते कोपरगावातील कोरोना सेंटरला भेटी देऊन आढावा घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असून आजपर्यंत ७४ नागरिकांचा बळी गेला असून दररोज शेकडो नागरीक कोरोना साथीचे बळी जात आहे.या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ हे जुहू विमानतळ येथून शिर्डी येथील विमानतळावर सकाळी नऊ वाजता खाजगी विमानाने येत आहे.
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे ४५९ श्राव तपासणीसाठी पाठवले असून त्यातील १८९ बाधित आले आले आहे.तर १३० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आजपर्यंत ७४ नागरिकांचे बळी गेले आहे.तरीही नागरिक शहरात टाळेबंदी पाळायला तयार असल्याचे दिसत नाही त्यामुळे आगामी काळातील चित्र भयावह दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा संपन्न होत आहे.
नगर जिल्ह्याचे पालक मंत्री मुश्रीफ हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सकाळी ११ वाजता कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील कोविड सेंटर येथे येणार असून तेथील सेंटरची पाहणी करणार आहे. त्या नंतर ते ११.१५ वाजता महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्ट येथील तीनशे खाटांच्या कोविड सेंटरची पाहणी करणार आहे.सकाळी ११.३० वाजता ते कृष्णाई मंगल कार्यालयात कोपरगाव तालुक्यातील कोरोना साथीबाबतचा सद्यस्थितीचा संबंधित अधिकारी यांच्या समवेत आढावा घेणार आहे.व दुपारी १२.३० नंतर ते मोटारीने शासकीय विश्रामगृह नगरकडे प्रयाण करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.