जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या ठिकाणी फुले,आंबेडकर जयंती संपन्न

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यावेळी जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेच्या आयोजित करण्यात आला होता.यावेळी २५० स्पर्धाकानी करणे भाग घेतला.

महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते मानले जातात.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार,थोर समाजसुधारक,कायदेपंडित,अर्थतज्ज्ञ आणि दलित बौद्ध चळवळीचे नेते होते.
जोतीराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय असून हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत,जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.सामाजिक प्रबोधन,अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन,आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते मानले जातात.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार,थोर समाजसुधारक,कायदेपंडित,अर्थतज्ज्ञ आणि दलित बौद्ध चळवळीचे नेते होते.त्यांनी अस्पृश्यता निवारण,महिलांचे हक्क आणि कामगार कल्याणासाठी आयुष्यभर लढा दिला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी बहुमोल योगदान दिले आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.त्या दोघा महापुरुषांची जयंती कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या ठिकाणी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव मैंद हे होते.

दरम्यान यावेळी वाचनालयाच्या वतीने सन्मानपत्र,रोख रक्कम आदी बक्षीसे देण्यात आली आहे.यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे,माजी सेवानिवृत्त पी.एस.आय.राजेंद्र लोखंडे,माजी जिल्हा परिषद संपत भारुड तसेच मधुकर साबळे,दिलीप ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,पोलिस पाटील लिना आचारी,ॲड.सतीश लोहकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वाचनालयाच्या वतीने त्यांना स्पर्धकांना मानपत्र रोख रक्कम व मिठाईचे वितरण करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते रामदास सोनवणे,साबळे,राजेंद्र लोखंडे, ॲड.नितीन पोळ,सुनील वाघमारे,विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित भारुड यांनी केले.तर आभार प्रा.कुंदा भारुड यांनी मानले आहे.



