जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या शहरात संत रविदास महाराज जयंती संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ आदींच्या संयुक्त वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

कोपरगाव शहरातील या मिरणुकीत रविदास महिलामंडळ ढोल पथक हे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
संत रविदास यांनी ‘मानवतावाद’ आणि ‘समानतेचा’ संदेश देत भक्ती चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.त्यांचा जन्मदिन हा माघ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.भारतातील हा उत्सव दरवर्षी केंद्रबिंदू असतो;देशभरातील लोक भारतात हा विशेष प्रसंग साजरा करतात.कोपरगाव शहरात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
संत रविदास हे १४ व्या-१५ व्या शतकातील महान संत,कवी आणि समाजसुधारक होते.संत रविदास यांचा जयंती देशभर साजरी केली जाते.हिंदू कॅलेंडरनुसार,माघ महिन्यातील पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो,जो सहसा फेब्रुवारी महिन्यात येतो.संत रविदास यांनी ‘मानवतावाद’ आणि ‘समानतेचा’ संदेश देत भक्ती चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.त्यांचा जन्मदिन हा माघ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.भारतातील हा उत्सव दरवर्षी केंद्रबिंदू असतो;देशभरातील लोक भारतात हा विशेष प्रसंग साजरा करतात.कोपरगाव शहरात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची मोठी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन सौ.व श्री संतोष बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले आहे.आधी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती.या मिरणुकीत रविदास महिलामंडळ ढोल पथक हे प्रमुख आकर्षण ठरले आहे.

यावेळी महाप्रसादाचे दाते भाऊसाहेब कानडे यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे आणि पदाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,बसस्थानक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेपुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप,मार्केट यार्ड,जुना टाकळी नाका,समाजमंदिर या मार्गाने ही पालखी मिरवणूक संपन्न झाली आहे.त्यानंतर समाज मंदिर येथे ह.भ.प.अण्णासाहेब महाराज शिंदे यांनी श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची महती प्रवचनाद्वारे विषद केले आहे.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे राहुरी कृषी विद्यापीठ अधिकारी डॉ.बबन इल्हे,प्रा.रमेश इल्हे,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते प्रसाद आढाव,योगीता आढाव,प्रशांत कडु,स्वप्नील कडु,फिरोज पठाण,इम्तियाज अत्तार,वाल्मिक लहिरे,विजय त्रिभुवन,राजेंद्र वाकचौरे,शिवसेना तालुका प्रमुख भरत मोरे,शहर अध्यक्ष गगन हाडा,अक्षय आंग्रे,वर्षाताई शिंगाडे फकीर कुरेशी,मारुती सरवार,योगेश निकम,वसंत थोरात,शहराध्यक्ष गणेश कानडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी महाप्रसादाचे दाते भाऊसाहेब कानडे यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे आणि पदाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ माजी जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी तर सूत्रसंचालन संजयजी दुशिंग यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष माधव पोटे यांनी मानले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशींग,संजय पोटे,गणेश कानडे,देविदास कानडे,राकेश धाकतोडे,संतोष कानडे,मयूर कानडे,संदेश कानडे,संतोष दळवी, संतोष बारसे,संदीप बारसे,गणेश शिंदे,गणेश दळवी,सागर पोटे,संतोष शिंदे,अँड.रमेश दुशिंग,जगन कानडे,रमेश मगर,संकेत कानडे,बबलू कानडे,अनिल कानडे,दत्तात्रय पठाडे, योगेश मगर,गोरक्षनाथ कानडे,महेश कानडे,संदेश कानडे,भैय्या कानडे आदींनी परिश्रम घेतले.



