आंदोलन
इथेनॉलचे दर कमी करा…या शहरात मागणी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र सरकारने इंधनात इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यामुळे इंजिनात बिघाड होत असून सरकार इथेनॉल दर कमी करण्यास तयार नाही त्यामुळे या इथेनॉलचे दर कमी करावे या मागणीसाठी आज शिवसेना उबाठा गटाने आज कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन इथेनॉल वापर बंद करावा,किंवा त्याचे दर कमी करावे अशी मागणी केली आहे.

“केंद्र व राज्य सरकारने डिझेल आणि पेट्रोल मध्ये इथेनॉल २० टक्क्यांचे मिश्रण करण्याचे बंद करावे.इथेनॉल वापराने गाड्यांचे इंजिन खराब होत आहे.त्याचा जनतेला आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.शासनाला इथेनॉल बंद करायचे नसेल तर शासनाने त्याप्रमाणे डिझेल व पेट्रोलचे दर कमी करावे”-गगन हाडा,शहर प्रमुख,शिवसेना,कोपरगाव शहर.
राज्यात आणि देशात वाहनंदार आणि तज्ज्ञांमध्ये पेट्रोलमधील २० टक्के इथेनॉल मिश्रणाबाबत (इ-20) संभ्रम आणि चिंता व्यक्त होत आहे.वाहनांचा मायलेज कमी होणे आणि इंजिनवर परिणाम होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.मात्र,केंद्र सरकार आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या मते यामुळे परकीय चलन वाचते व शेतकरी समृद्ध होतात.इथेनॉलची ऊर्जा क्षमता कमी असल्याने गाड्यांचे मायलेज थोडे कमी होते.जुन्या वाहनांच्या इंधन प्रणालीमुळे वाहनांच्या इंजिनवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप होत आहे.या बातम्यांनी सोशल मीडियावर वाहनधारकांत भीती पसरली आहे.त्यामुळे हा मुद्दा काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाने आज कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन इथेनॉलचे दर कमी करावे अशी मागणी केली आहे.

त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”केंद्र व राज्य सरकारने डिझेल आणि पेट्रोल मध्ये इथेनॉल २० टक्क्यांचे मिश्रण करण्याचे बंद करावे.इथेनॉल वापराने गाड्यांचे इंजिन खराब होत आहे.त्याचा जनतेला आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.शासनाला इथेनॉल बंद करायचे नसेल तर शासनाने त्याप्रमाणे डिझेल व पेट्रोलचे दर कमी करावे.महाराष्ट्रातील उत्स उत्पादक शेतकरी साखर कारखाने तसेच संबंधित कामगार घटकांसाठी इथेनॉल निर्मिती हा अत्यंत महत्वाचा विषय बनला आहे.देशाच्या उर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे.मात्र इथेनॉलचे संदर्भातील धोरणे दर उत्पादनासाठी उपलब्ध कच्चा माल उस व साखरेचे नियोजन आणि कारखान्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक अडचणी निर्माण होत आहे.त्याचा थेट परिणाम उस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगावर होत आहे.त्यामुळे शासनाने या मागण्यांचा गांभिर्याने विचार करुन तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही शेवटी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीरंग दिनकर चांदगुडे,शहर प्रमुख गगन हाडा,उपजिल्हाप्रमुख असलम शेख,तालुका संघटक बाळासाहेब जाधव,शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्माभाऊ जावळे,विधानसभा प्रमुख विवेक कुलकर्णी,युवा सेना प्रमुख विजय गोर्डे,माजी तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,संजय दंडवते आदीनी शेवटी केली आहे.



