जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी,’रास्ता रोको’ आंदोलन!

न्यूजसेवा


वाकडी (किरण शिंदे)

  राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील गणेश कारखाना परिसरात असलेल्या गणेशनगर ते एकरूखे मार्गावरील सुमारे दोन किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून वेळोवेळी मागणी करूनही हा रस्ता दुरुस्त न झाल्याने उद्या दुपारी 3 वाजता गणेशनगर येथील या रस्त्यावर ग्रामस्थांनी,’रास्ता रोको’ आंदोलन जाहीर केले आहे.त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

संग्रहित छायाचित्र.

“राहाता तालुक्यातील गणेशनगर ते एकरूखे चितळी मार्गावरील गणेश कारखाना कमान पर्यंत सुमारे दोन किलोमीटर रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून या रस्त्यावरुन पायी जाणे सुद्धा अवघड झाले आहे.हा रस्ता दैनंदिन दळणवळण व विद्यार्थी व शिर्डी शिंगणापूर भाविकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी अनेकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे,निवेदन देऊन आग्रह धरत मागणी केली परतू अद्याप हा रस्ता दुरुस्त झालेला नाही”-रूपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

   कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.कोपरगाव-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग,झगडे फाटा-रांजणगाव देशमुख रस्ता (राज्य मार्ग ६५),आणि साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनचा ७ कोटींचा चौपदरी रस्ता अवघ्या काही वर्षांतच खचल्याने नागरिक त्रस्त आहेत.खड्डे,उडणारी धूळ व सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.सावळीविहीर लासलगाव रस्त्याचे कामाला गती येत नसल्याने व पर्यायी रस्ता ठीक नसल्याचे अपघातांची मालिका तालुक्यात सुरूच आहे.याखेरीज राहाता तालुक्यातील गणेशनगर ते एकरूखे या रस्त्याची वाट लागली आहे.परिणामी कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोट्यावधी रुपये खर्चून बनवलेले रस्ते काही महिन्यांतच उखडले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.खराब रस्ते आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालक व नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.महामार्गालगतची अतिक्रमणे आणि रस्त्यांची अपूर्ण कामे यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दळणवळण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरूस्ती व पुनर्बांधणी करणे आहे.मात्र याकडे सार्वजिक बांधकाम विभागाचे आणि राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी या मार्गांवर अपघातांची मोठी मालिका सुरू असून त्यात प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचे हकनाक बळी जात आहे.त्यामुळे संतप्त होत गणेशनगर आणि वाकडी परिसरातील नागरिकांनी हा रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले आहे.

   दरम्यान त्याबाबत त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”राहाता तालुक्यातील गणेशनगर ते एकरूखे चितळी मार्गावरील गणेश कारखाना कमान पर्यंत सुमारे दोन किलोमीटर रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून या रस्त्यावरुन पायी जाणे सुद्धा अवघड झाले आहे.हा रस्ता दैनंदिन दळणवळण व विद्यार्थी व शिर्डी शिंगणापूर भाविकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी अनेकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे,निवेदन देऊन आग्रह धरत मागणी केली परतू अद्याप हा रस्ता दुरुस्त झालेला नाही,तसेच आठ दिवसात धनगरवाडी येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत सदगुरू गंगागिरीजी महाराज यांचा 179 वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे.या सप्ताहस्थळी अहिल्यानगर मधील कोपरगाव,राहाता,नासिक जिल्ह्यातील सिन्नरसह संभाजीनगर जिल्ह्यातील भाविक लाखोंच्या संखेने याच रस्त्यावरुन ये-जा करणार आहे.हा रस्ता प्रचंड अपघातग्रस्त बनला आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी व दैनंदिन प्रवासी त्रस्त झाले आहे हा रस्ता दुरुस्त न झाल्याने संबंधित विभागाचा निषेध म्हणून या रस्त्यावर उद्या दुपारी 3 वाजता,’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती येथील कार्यकर्ते अशोक लोंढे,शेतकरी संघटनेचे रूपेंद्र काले,विठ्ठलराव शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकात दिले आहे.निवेदनाची प्रत राहाता पोलिस ठाणे,प्रांत अधिकारी शिर्डी व सार्वजनिक बांधकाम उपविभाग राहाता आदींना दिल्या असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close