जाहिरात-9423439946
आंदोलन

पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी ४० हजारांचा खुर्दा ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ग्रामपंचायतने आपल्या कार्यकाळात एक विक्रम केला असून पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी चक्क चाळीस हजार रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप येथील कार्यकर्ते अजय गवळी यांचेसह अनेक ग्रामस्थानी आज कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्याकडे समक्ष भेटून केला आहे.त्यामुळे मढी खुर्दसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

निवेदन देताना मढी खुर्द येथील कार्यकर्ते दिसत आहेत.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने मढी खुर्दचे सरपंच सुनील भागवत यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही मात्र उपसरपंच बिपीन गवळी यांचा संपर्क झाला असता त्यांनी ग्रामपंचायतीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असा दावा केला आहे.तर ग्रामपंचायत अधिकारी किरण राठोड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीत असा कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे खंडन केले आहे.

   ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध विकास योजना राबविल्या जातात.अनेक योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याची प्रकरणे दररोज आपल्यासमोर येतात.यापुढे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा,असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे.ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार,ग्रामपंचायत मालमत्ता तथा निधीच्या अपहारास जबाबदार असणारे सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक यांच्याकडून अपहारित रक्कम वसूल झाल्यावर अन्य कारवाई करताना टाळाटाळ होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.अशा भ्रष्ट सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक यांचा कार्यकाळ संपल्याने पुढील कार्यवाही केली जात नसल्याने अहवालात नमूद केले आहे.

 

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने या प्रकरणी मागोवा घेतला असता त्यात पाण्याची टाकी धुण्याचा खर्च दाखवला असला तरी प्रत्यक्षात त्या निधीतून गावातील मुरूम टाकला असल्याची माहिती हाती आली असल्याचे समजत आहे.मात्र विरोधक तांत्रिक मुद्दा पुढे करून कैचीत पकडत असल्याचे बोलले जात आहे.

   वास्तविक ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने नवीन निर्देश पुन्हा दिले आहेत.विधीमंडळाच्या पंचायत राज समितीने शासनाच्या निदर्शनास आणल्यानुसार ग्रामपंचायतीमधील आर्थिक गैरव्यवहारास,ग्रामपंचायत मालमत्ता तथा निधीच्या अपहारास जबाबदार असल्याने सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायतीच्या सचिव,ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि संबंधित व्यक्ती यांच्याकडून अपहारित मालमत्ता,रक्कम वसुली बरोबरच त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल कार्यवाहीसुद्धा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र त्याची अंमलबजावणी होते का हा मूळ प्रश्न आहे.त्यामुळे अनेक भ्रष्टाचाऱ्यांचे फावत असते अशीच घटना कोपरगाव तालुक्यात मढी खुर्द येथील ग्रामपंचायतीत नुकतीच ग्रामसेभत उघड झाली असून त्यामुळे मढी खुर्दसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत आज पुन्हा एकदा येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कोपरगाव पंचायत समितीत धाव घेऊन गतविकास अधिकारी संदीप दळवी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

    दरम्यान सदर मढी खुर्द ग्रामपंचायती ची मुदत आणखी दोन दिवसांनी संपत आहे.त्यातच सरपंच आणि महोदयांनी सदर तहकूब ग्रामसभा वेळेवर घेणे गरजेचे असताना ती टाळली असल्याचा त्यांचा आरोप असून आता दोन दिवसात ग्रामसभा वेळेअभावी होणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.परिणामी ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय निर्माण झाला आहे.त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई  करावी अशी मागणी अजय गवळी यांनी केली आहे.

   दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने मढी खुर्दचे सरपंच सुनील भागवत यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही मात्र उपसरपंच बिपीन गवळी यांचा संपर्क झाला असता त्यांनी ग्रामपंचायतीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असा दावा केला आहे.तर ग्रामपंचायत अधिकारी किरण राठोड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीत असा कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे खंडन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close