जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दुचाकीस्वाराने ज्येष्ठास उडवले,मद्यपान नडले,तिघांवर गुन्हा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
कोपरगाव शहरातील पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या जियो स्टोअर समोर नुकताच दोन दुचाकीमध्ये अपघात होऊन या अपघातात एक पोहेगाव येथील तरुण रोहित रमेश शिंदे हा गंभीर रित्या जखमी झाला अससताना आज पुन्हा एक अशी घटना समोर आली असून यात जुनी गंगा बेट,कोपरगाव येथे एका दुचाकी स्वाराने दिलेल्या धडकेत रामभाऊ बलभीम देवकर(वय-75) यांचे पायावरून गाडी गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची बाब उघड झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान आणखी एका घटनेत हेडकॉन्स्टेबल शेलार यांनीच वाल्मीक सोपान कापे,(वय -32) रा.जंगली महाराज आश्रमामागे कोकमठाण व शुभम भीमा काळे (वय-28) रा.समतानगर,कोपरगाव याचे विरुद्ध मद्यपान करून वाहन चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे मद्यपान करून वाहन चालविणारे असामाजिक तत्त्वांत भितीचे वातावरण पसरले आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यातील रस्त्यांची पार रया गेली आहे.त्यामुळे तालुक्यात अपघातांची मालिका दिसून येत आहे.यात अनेक नागरिक हकनाक बळी जात आहे.राष्ट्रीय महामार्ग,राज्य महामार्ग,आणि ग्रामीण रस्ते त्याला अपवाद नाही.सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे.राजकीय नेते आणि त्यांचे पित्ते केवळ आरोप- प्रत्यारोप यात गर्क आहे.त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात सामान्य नागरिकांना कोणी वाली असल्याचे दिसून येत नाही.नगर-मनमाड रस्त्याची तर गोष्टच विचारला नको,विशिष्ट लग्न तिथीला हमखास पुणतांबा फाटा आणि सावळीविहिर फाटा ही ठिकाणी म्हणजे वाहतूक कोंडीचे मॉडेल ठरले आहे.या दहा कि.मी.अंतरात प्रवाशांना तब्बल दोन ते तीन तासांचा वेळ वाया जात असून अपघात होऊन अनेक जण जायबंदी होत आहे.तर कित्येकांना आपले प्राण सोडून द्यावे लागले आहे.त्यात वित्तीय हानीची कोणतीही मोजदाद नाही.गेली पंचवीस वर्षे याची पुनरावृत्ती होत आहे.नेते निवडणुकीत आश्वासने देतात आणि मतदार ती विसरून जातात.कामातील टक्का हा या रस्त्याचे कामात सर्वात मोठा अडथळा ठरला आहे.याचा आरोप थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच नगर दौऱ्यात केला होता.यापेक्षा दुरावस्था ती कोणती असू शकते असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.कोपरगाव तालुक्यात विरोधक औषधाला उरला नाही.सगळे राज्य एकहाती आहे.तालुक्याला दोन आमदार लाभले आहे.मात्र समस्या जैसे थे आहेत.त्यामुळे तालुक्यात बेबंदशाही मजली असे म्हटले तर वावगे वाटू नये अशी वाईट स्थिती उद्भवली आहे.त्यामुळे एकीकडे वाळूचोर,अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे.तर तीसरीकडे रस्त्याचा बट्ट्याबोळ,आणि प्रवाशांचे बळी.या साडेसातीतून त्यांची सोडवणूक कोण करणार ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.अशीच घटना नुकतीच उघडकिस आली असून यातील जखमी इसम रामभाऊ देवकर हे लग्नतिथीच्या दिवशी भक्त निवास येथून एक लग्न लावून परतत असताना त्यांना जनार्दन स्वामी मंदिराजवळ एक दुचाकीस्वार (वाहन क्रमांक एम.एच.16 डी.झेड. 2006) भरधाव वेगाने येऊन त्याने रामभाऊ देवकर यांना उडवले असून त्यांच्या पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे.या प्रकरणी गाडीवरील चालक अपघातानंतर कोपरगाव शहर पोलिसांना कोणतीही खंबर न घेताच पळून गेला आहे.

  दरम्यान त्याचे विरोधात फिर्यादी रामभाऊ देवकर यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 387/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281,125,(अ)125(ब) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हे करीत आहेत.

   दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी वाहतुक नियंत्रण व नाकेबंदी करत असताना त्यांना इंगळे गल्ली,वैजापूर येथील आरोपी शौकत अयुब पठाण (वय-40) हा मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवताना आढळून आला आहे.त्याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी पोलिस हेड कॉन्स्टेबल डी.जे.शेलार यांनी गुन्हा दाखल केला आहे.तर आणखी एका घटनेत हेडकॉन्स्टेबल शेलार यांनीच वाल्मीक सोपान कापे,(वय -32) रा.जंगली महाराज आश्रमामागे कोकमठाण व शुभम भीमा काळे (वय-28) रा.समतानगर,कोपरगाव याचे विरुद्ध मद्यपान करून वाहन चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे मद्यपान करून वाहन चालविणारे असामाजिक तत्त्वांत भितीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close