साहित्य व संस्कृती
मराठी भाषेची गोडी ग्रामीण महाराष्ट्रात-माजी नगराध्यक्ष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठी भाषेची गोडी ग्रामीण बोली भाषेत असून प्रमाण भाषा व बोली भाषा जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून हा दिन साजरा करण्यात येतो.
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासनानें निर्णय घेतलेला आहे.कोपरंगावातही हा दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून “शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य” कोपरगाव शाखेच्या वतीने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र कोयटे,ग्रंथपाल अजित कसाब,कवी कोळगे राऊत,बाळासाहेब देवकर,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई,राजेंद्र कोयटे,संतोष तांदळे,एड,पुनम गुजराथी,शैलजा रोहोम,कैलास साळगट आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मराठी भाषा दिनानिमित्त अनेक ठिकाणी अनेक प्रकारे विचारमंथन व प्रबोधन केले जाते मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु कालौघात बदल घडतात आणि आपली मराठी भाषा आपल्या पासून दुरावत जाते आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कमकुवत होते आहे घरातही मराठी भाषा कमीप्रमाणात वापरात असून खरे मराठीपण ग्रामीण बोलीभाषेत असून ती जतन केली जावी”असे आवाहन माजी नगराध्यक्ष कुदळे यांनी शेवटी व्यक्त केले आहे.
कविसंमेलन प्रसंगी नंदकिशोर लांडगे,सोमनाथ मंडाळकर,दत्तात्रय विरकर,प्रमोद येवले,हेमचंद्र भवर,सुनीताताई इंगळे,प्रा.मधुमिता निळेकर,बालकवयित्री पावले आदिंनी आपल्या कविता सादरीकरण केले आहे.
प्रारंभी प्रास्ताविक कैलास साळगट यांनी केले मराठी भाषेविषयी कवी संतोष तांदळे वात्रटिकाकार राजेंद्र कोयटे डॉ दादासाहेब गलांडे सौ कुलकर्णी मॅडम श्वेतांबरी राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.