जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अज्ञात वाहनाच्या धडकेत कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिरवाडे वाकद-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मंजूर रहिवासी असलेले इसम चांगदेव रघुनाथ भोसले (वय-)यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत वाकद फाटा येथे मृत्यू झाला असून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नातीचे लग्न आटोपल्यावर शेतकरी चांगदेव भोसले हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी घरी गेले होते.सायंकाळी मनोज सोनवणे व चांगदेव भोसले हे पुन्हा लग्नस्थळी येत असतांना त्यांच्या (एम.एच.१५ बी.जे.१०१८) या क्रमांकाच्या हिरो आयस्मार्ट दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली.या अपघातात भोसले यांचें निधन झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”भरवस फाटा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे नात मयुरी भोसले हिचे नुकतेच लग्न होते.लग्न आटोपल्यावर चांगदेव भोसले हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी घरी गेले होते.सायंकाळी मनोज सोनवणे व चांगदेव भोसले हे पुन्हा लग्नस्थळी येत असतांना त्यांच्या (एम.एच.१५ बी.जे.१०१८) या क्रमांकाच्या हिरो आयस्मार्ट दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली.या अपघातात भोसले यांच्या उजव्या हात पाय व डोक्याला जबर मार लागला होता.त्यांना बेशुद्ध अवस्थेत लासलगाव येथील कृष्णाई हॉस्पिटल व नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी त्यांचे पुत्र विजय भोसले यांच्या तक्रारीवरून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स.पो.नी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय एल.के.धोक्रट,पो.नाईक संदीप शिंदे,औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close