जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घरात घुसून महिलेचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील हिंगणवेढे,घारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेच्या घरात त्याच गावातील आरोपीने (वय-४७) घुसून लिंबाच्या झाडाची फांदी रस्त्यात पुढे का सरकवली ? असा जाबसाल करून तिचा घरात घुसून विनयभंग केला असल्याची फिर्याद सदर महिलेने (वय-४५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हिंगणवेढे घारी येथील विंनयभंग करणाऱ्या आरोपीस कोपरगाव तालुका पोलिसांनी कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले आहे.व त्यास १४ दिवसांची न्यायिक कोठडी मागितली आहे.तथापि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास दिवसाची न्यायिक कोठडी सुनावली असून अटी शर्तीवर पंधरा हजारांचा जामीन मंजूर केला आहे.

फिर्यादी महिला हि हिंगणवेढे घारी या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे.शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी हा सदर फिर्यादी महिला तिच्या घरी एकटी असताना दारू पिऊन आला व पिलेल्या अवस्थेत त्याने सदर महिलेला म्हणाला की,”तू,माझ्या लिंबाची झाडाची फांदी सरकवून पुढे का ठेवली ? असे म्हणून सदर महिलेला शिवीगाळ करून तिचे तोंडात चापटी मारून तिच्या अंगाला झटून तिचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आहे.
सदर महिलेचा मुलगा तिला सोडवण्यास आला असता त्याला देखील शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.सदर महिलेने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.६१/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,४५२,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसानी आरोपीस अटक केली असून त्याची वैद्यकीय तपासणी केली असून कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले आहे.व त्यास १४ दिवसांची न्यायिक कोठडी मागितली आहे.तथापि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास दिवसाची न्यायिक कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.आरोपीच्या वतीने अड्.सुयोग जगताप यांनी काम पाहिले आहे.न्यायालयाने आरोपीस पंधरा हजारांचा जामीन अटी शर्तींवर मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close