जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

नामदेव ढसाळ यांचे पूर येथे स्मारक उभारणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांचे उचित स्मारक होण्यासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याचे आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शनभुराज देसाई यांनी कनेरसर येथे नुकतेच दिले आहे.

“साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी खेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रयत्नवादी होवून अन्याय अत्याचार दादागिरी विषमता नष्ट करणे साठी अहोरात्र प्रयत्न केले”-डॉ.श्रीपाल सबनीस,उदघाटक.

दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या मुळ जन्मगावी पुर,कनेरसर येथे संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले.त्यावेळी उत्पादनशुल्क शुल्क मंत्री ना.शंभुराजे देसाई हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब गावडे हे होते.

   सदर प्रसंगी संमेलनाचे उदघाटक डाॅ.श्रीपाल सबनीस,माजी खा.शिवाजीराव आढळराव,स्वागताध्यक्ष अशोक तावरे,संयोजक महाराष्ट प्रदेश अध्यक्ष पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे,प्रा.राजेंद्र सोनवणे,निमंञक शुभम सोनवणे,अॅड.जयदेव गायकवाड,भगवान पोखरकर,अॅड,विजयसिंह शिंदे,अॅड.प्रकाश शितोळे,कवी म.भा.चव्हाण,श्रीकांत चौगुले,सुनीताराजे पवार,वि.दा.पिंगळे,डाॅ.सुरेश वाकचौरे,सुनिल थिगळे,काळुराम घोडके,मिलींद इंगळे,रमेश गोडसे,शांताराम पाटोळे,सरपंच अश्विनी साबळे,भाग्यश्री चव्हाण,सुनिता केदारी,दौलतराव सोनवणे,कृष्णराव ढसाळ,साहित्यिक ॲड.प्रकाश शितोळे,पत्रकार इसाक मुलाणी,सुनिल थिगळे,काळुराम घोडके,उद्योजक मिलिंद पिंगळे,रमेश गोडसे,शांताराम पाटोळे सरपंच अश्विनी साबळे,भाग्यश्री चव्हाण,सुनीता केदारी,दौलतराव सोनवणे पूरगावचे सुपूत्र कृष्णराव ढसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

   सदर प्रसंगी डाॅ.श्रीपाल सबनीस म्हणाले की,”काळ्या खडकावर विसावलेल्या काळ्या मातीवर उभे असलेल्या सह्याद्रीच्या कपारी मध्ये वसलेल्या वेळनदीच्या त्रिसंगम काठावर हिरवा शालू नेसलेल्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय,हुतात्म्यांच्या बलिदानाने पुनित झालेल्या संत ज्ञानेश्वरांच्या कर्तुत्वाने फुललेल्या महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यामाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माय भुमी मध्ये सर्व सामान्य दलित कुंटूबा मध्ये साहित्यरत्न पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जन्म पूर कनेरसर या छोट्याशा गावात झाला,आपल्या मातृभुमिमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी मनामध्ये सामाजिक धार्मिक कार्य करण्याची धडपड अवघड छंद मनामध्ये बाळगून ज्याप्रमाणे काटेरी गुलाबाला लाल कळी येवून ती फुलून माणसंच मनमोहीत करते त्याचप्रमाणे विश्र्व साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी खेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रयत्नवादी होवून अन्याय अत्याचार दादागिरी विषमता नष्ट करणे साठी अहोरात्र प्रयत्न केले,भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धारणा डोळ्यासमोर ठेवून दलित बांधवांचा न्याय हक्कासाठी लढा दिला त्यांनी अनेक पुस्तके लिहिली कवी लेखक साहित्यिक म्हणून जगप्रसिद्ध मिळाली असल्याचे शेवटी सांगितलें आहे.

   संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक केले.कनेरसर येथील थोर सुपुत्रांचा वारसा जतन करण्यासाठी संमेलन आयोजित करून अभिवादन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे मत त्यांनी  व्यक्त केले.

    यावेळी नामदेवराव ढसाळांचे साहित्य क्षेत्रातील योगदान व ग्रामीण साहित्य चळवळीचे वास्तव यावर परिसंवाद झाला.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य कार्यवाह सुनीताराजे पवार,ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले,वि.दा.पिंगळे.डाॅ.सुरेश वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

  सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे,अस्मिता मराठे यांनी केले तर उपस्थितांचे निमंत्रक शुभम सोनवणे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close