जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगावातील …या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ०२ कोटी निधी-माहिती

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या धोत्रे ते लौकी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ०२ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साई संस्थानचे ना.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी सर्व खराब रस्त्यांचा एकत्रित आराखडा तयार करून या रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्यातून मतदार संघातील रस्त्यांसाठी दोन वर्षात जवळपास १३० कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,साईबाबा संस्थान शिर्डी.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी सर्व खराब रस्त्यांचा एकत्रित आराखडा तयार करून या रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्यातून मतदार संघातील रस्त्यांसाठी दोन वर्षात जवळपास १३० कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे.त्यामुळे मतदार संघातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.

अशाच खराब असलेल्या रस्त्यांपैकी धोत्रे ते लौकी रस्त्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता.त्या पाठपुराव्याची महा विकास आघाडी सरकारने दखल घेवून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ०२ कोटी निधी मंजूर केला आहे.त्यामुळे या रस्त्याने नियमितपणे ये जा करणाऱ्या नागरिकांची व वाहन धारकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.उर्वरित रस्त्यांसाठी देखील पाठपुरावा सुरूच आहे. येत्या काही महिन्यात मतदार संघातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा मानस असून महाविकास आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या मदतीच्या व सहकार्याच्या जोरावर लवकरच रस्ते विकासाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

धोत्रे ते लौकी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ०२ कोटी निधी दिल्याबदद्ल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.दत्ता भरणे यांचे ना.काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close