जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

संस्कार शिबिरातून विद्यार्थ्याला मिळते संस्काराची शिदोरी-परमानंद महाराज 

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
    कोकमठाण येथील आत्मा मालिक बालसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजन,विविध खेळ,जलतरण,कला,नृत्य,अभिनय इत्यादी गुणांना वाव दिला जातो.त्याचबरोबर प्रामाणिकपणा,स्वयंशिस्त वेळेचे महत्व,स्वच्छता,व्यायाम,देशप्रेम,नित्य ध्यान,योगा,प्राणायाम या संस्काराची शिदोरी विद्यार्थ्याला या शिबिरातून मिळत असल्याचे प्रतिपादन परमानंद महाराजांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

या आत्मविष्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक या विषयावर अप्रतिम नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच “ पाणी हेच जीवन” हे बाल नाट्य सादर करून त्यातून “पाणी आडवा पाणी जिरवा” हा संदेश दिला आहे.

   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये नुकतेच बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.या शिबिरात सात दिवस द्वितीय बॅच १८ दिवस बॅचचा पारितोषिक वितरण व आत्मविष्कार सोहळा संपन्न झाला आहे.या शिबिरामध्ये कला,क्रीडा,नृत्य,अभिनय,जलतरण या विभागात लक्षवेधी  कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते.

   या सोहळ्यासाठी सोनी मराठी फिल्म गजानन शेगावचे या मालिकेतील स्वरा मुसळे यांचेसह संस्थेचे विश्वस्त परमानंद महाराज,गणेश महाराज,आश्रमचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,विश्वस्त जाधव भाई पटेल,प्रकाश गिरमे,प्रकाश भट,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे सर्व प्राचार्य,विभाग प्रमुख,आदी मान्यवर उपस्थित होते.

  या आत्मविष्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक या विषयावर अप्रतिम नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच “ पाणी हेच जीवन” हे बाल नाट्य सादर करून त्यातून  “पाणी आडवा पाणी जिरवा” हा संदेश उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना दिला तसेच शिबिरार्थींनी बहारदार गाण्यांचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आत्मविष्कार सोहळ्यामध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी शिबिरार्थीर्नी पार पाडली आठ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कालेकर व अजय देसाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुधाकर मालीक यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close