पुरस्कार,गौरव
महामंडलेश्वर स्वामी रामदास महाराज यांचा सत्कार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महामंडलेश्वर स्वामी रामदास महाराज यांचा सत्कार संपन्न
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे एका कार्यक्रमा निमित्त हरियाणा राज्यातील कर्नाल जिल्हयातील महामंडलेश्वर स्वामी रामदास महाराज आले असताना त्यांचा श्रीरामपूर येथील ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी सत्कार केला आहे.
महामंडलेश्वर स्वामी रामदास महाराज यांचे तीस वर्षांपूर्वी भारत भ्रमण सुरु असताना त्यांचा श्रीरामपूर येथील पढेगाव येथील बनकर पाटील यांच्या घरी मुक्काम घडला होता.त्या वेळी त्यांच्या निवासाची व्यवस्था बनकर यांनी केली होती.तोपासून त्यांचे ऋणानुबंध जोडले गेले होते ते आजपर्यंत कायम आहे हे विशेष !
त्या नंतर पढेगाव येथील वारकरी तीर्थ यात्रेवर असताना कर्नाल येथे यांच्या आश्रमात गेले असता महामंडलेश्वर स्वामी रामदास महाराज यांनी त्यांचा मोठा मानसन्मान केला होता.तोपासून त्यांचे व पुढे श्री क्षेत्र सराला बेट येथील ब्रम्हलीन महंत नारायणगिरीजी महाराज यांचे ऋणानुबंध जोडले गेले होते.
दरम्यान त्यांनी त्यांना खंडाळा येथील सप्ताहात त्यांना तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत प्रवचन करण्याची संधी दिली होती.इतके ते घट्ट झाले होते.तो पासून सदर स्वामी पढेगाव येथे सातत्याने सलग तीस वर्ष आपली प्रवचन व ‘रामचरित मानस’ सेवा पढेगावकरांना समर्पित करत आहेत.या वर्षीही ती नित्यनेमाने दिली आहे.त्यानिमित्त ह.भ.प.संजय महाराज यांनी त्यांचा सत्कार केला आहे.त्यावेळी महामंडलेश्वर स्वामी रामदास यांनी समाधान व्यक्त केले आहे.