जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सरात हनुमान जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच वीर हनुमान जयंती मोजक्या भाविकांच्या साक्षीने व कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा नियम पाळत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे.मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.या वेळी ती पाळण्यात आली मात्र अगदी थोड्या भाविकांनी या पूजेत सहभाग नोंदवला आहे.मात्र यावर्षी जगात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले असताना बाकी उत्सवाला भाविक भक्तांना फाटा द्यावा लागला आहे.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात.महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे.मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.या वेळी ती पाळण्यात आली मात्र अगदी थोड्या भाविकांनी या पूजेत सहभाग नोंदवला आहे.मात्र यावर्षी जगात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले असताना बाकी उत्सवाला भाविक भक्तांना फाटा द्यावा लागला आहे.
संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रामवाडी,लक्ष्मणवाडी, दशरथवाडी,नउचारी,धोत्रे,दहिगाव बोलका, गोधेगाव, आदी गावात हा जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.तालुका प्रशासने या बाबत आवाहन केले होते.या वेळी भाविकांनी मानव जातीवर आलेले संकट दूर करण्यासाठी मारुतीरायाला साकडे घातले आहे.कार्यक्रमात खंड पडू नये याची दाखल भाविकांनी घेतली आहे.या बाबत प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close