जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

काळे-कोल्हे एकच यावर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघात दि.२० नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या निवडणुकीचे निकाल आज दुपारी जाहीर झाले असून यात धाकट्या पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेददार आशुतोष काळे हे राज्यात मोठ्या गणल्या गेलेल्या मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांत समावेश झालेला असून त्यांना माजी आ.कोल्हे यांनी आपल्या घराण्याच्या मैत्रीला जागून माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या १९९९ च्या विजयात मोलाची भूमिका निभावल्या बद्दल आ.आशुतोष काळे यांना सहाय्य केले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ही दोन्ही घराणी एकत्र आल्याने त्यांना राज्यात तृतीय क्रमांकाचे विक्रमी ०१ लाख ६१ हजार १४७ मते मिळवून ०१ लाख २४ हजार ६२४ मताधिक्य घेऊन विजय मिळाला आहे.त्यांनी आपले प्रतिस्पर्धी थोरल्या पवारांचे उमेदवार संदीप वर्पे यांचा पराभव केला आहे त्यांना केवळ ३६,५२३ मते मिळाली आहे.तर तिसऱ्या क्रमांकाची ३,६४० मते पिपाणी असलेल्या शिवाजी कवडे यांना मिळाली असून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना चौथा क्रमांक मिळून त्यांनी ११८८ मते मिळवली आहेत.

आशुतोष काळे यांचा विजय घोषित झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे यांनी आपल्या सुपुत्राची गळा भेट घेतली तो क्षण,तर नंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले ते छायाचित्र.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत काही मुस्लिम कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला महायुती चालविण्याचा आदेश आमच्या ईशान्य गडावरून असल्याची माहिती नाव न छापण्याचे अटीवर दिली आहे.मात्र महा आघाडीला निम्मी मते दिली असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.

  

कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष करताना आ.आशुतोष काळे दिसत आहेत.

राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी अहील्यानगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो.संगमनेर,शिर्डी, अकोले,कोपरगाव,श्रीरामपूर,नेवासा,शेवगाव,पाथर्डी,राहुरी,पारनेर,अहील्यानगर शहर,श्रीगोंदा,कर्जत जामखेड हे अ.नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. अ.नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले.त्यातले त्यात कोपरगाव तालुका काळे कोल्हे यांच्या चिरपरिचित राजकारणामुळे ओळखला जातो.येथील रेवडी कुस्त्या विशेष गाजतात.यावेळी तर त्यांचा आमनासामना न होण्यात भाजपने आपला सिंहाचा वाटा उचलला होता.परिणामी ही लढत आधी रंग भरत आहे असे वाटत असताना काळे आणि कोल्हे एकत्र आल्याने ती एकेरी ठरली आहे.या ठिकाणी राज्य सरकारची,’लाडकी बहिण योजना’,’व्होट जिहाद’ प्रकरणी तापलेले वातावरण,त्याच्या जोडीला असताना त्यांना गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,राजेंद्र जाधव,भाजपचे निष्ठावान सहकारी व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,मुस्लिम,दलीत मते आदींनी साथ दिली होती.त्यामुळे आशुतोष काळे यांना राज्यात तृतीय क्रमांकाचे विक्रमी १ लाख ६१ हजार १४७ मते मिळाली आहे तर संदीप वर्पे ३६,५२३ यांना इतकी किमान मते मिळाली असून आ.आशुतोष काळे यांना १,२४,६२४ मतांची विक्रमी आघाडी मिळाली आहे.

दरम्यान विवेक कोल्हे यांनी आपली स्वतःची स्वतंत्र चूल मांडून आपल्या महायुतीच्या विजयाचा जल्लोष साजरा केला तो क्षण.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत काही मुस्लिम कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला महायुती चालविण्याचा आदेश आमच्या ईशान्य गडावरून असल्याची माहिती नाव न छापण्याचे अटीवर दिली आहे.मात्र महा आघाडीला निम्मी मते दिली असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.

   दरम्यान महाआघाडीचा ज्या मुस्लिम मतांवर डोळा होता ती मुस्लिम मते महायुतीच्या पारड्यात पडल्याने आशुतोष काळे यांचा विजय खुपच सुकर झाला आहे.तर संदीप वरपे यांना केवळ शिवसेना उबाठा गटाची केवळ साथ उरली होती.त्यात शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांची वाताहत झाली आहे.त्यांना केवळ ३६ हजार ५२३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. तर ज्याचे सामाजिक क्षेत्रात नाव होते त्या संजय काळे यांना केवळ ११८८ मते मिळवून त्यांना,”तुम्ही सामाजिक कामे करा;राजकारण हा तुमचा प्रांत नाही” असा स्पष्ट संदेश मतपेटीतून तालुक्यातील मतदारांनी दिला आहे तर अदखलपात्र असलेले उमेदवार केवळ पिपाणी चींन्ह घेऊन लढलेले उमेदवार शिवाजी कवडे यांनी तिसऱ्या क्रमांकाची ३,६४० मते मिळवली हे विशेष ! याची मतदार संघात सर्वत्र चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close