गुन्हे विषयक
दरोडेखोरांचा कोपरगाव तालुक्यात राडा,लूट रोखली,सुवर्णकारासह दोन जण जखमी

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावं ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय -५५) यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर आज सायंकाळी ५.४५ वाजता अज्ञात तीन दरोडेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दुकान लुटून जात असताना नागरिकांनी त्यांना घेरल्याने त्यांचा नाईलाज झाला आहे.त्यांना ग्रामस्थानी दगडफेक करून ग्रामस्थांनी बाजार तळाजवळ पकडले असून यातील एक दरोडेखोर पलायन करण्यात यशस्वी झाला आहे.या झटापटीत दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

सदर घटनेच्या ठिकाणी आरोपी ग्रामस्थांना भीती दाखविण्यासाठी हातात एक तलवार उंचवताना दिसत आहे.
दरम्यान आताच आलेल्या माहितीनुसार पोलिस विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांनी आपले पथकासह घटनास्थळी हजर होऊन आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन शिर्डी कडे प्रयाण केले आहे.
दरम्यान ही घटना येथील मेडिकलचे व्यवस्थापक राजेंद्र कोल्हे यांनी शिर्डी येथील विभागीय पोलिस अधिकारी शिरीष वामाने यांना दूरध्वनीद्वारे कळवली असून ते आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचत असल्याचे माहिती आहे.

घटनास्थळी ग्रामस्थांनी केलेली गर्दी दिसत आहे.
यातील सविस्तर वृत असे की,यातील जखमी सुवर्णकार ज्ञानेश्वर माळवे हे व त्यांचा मुलगा संकेत माळवे हे कोपरगाव कोळगाव येथील मूळ रहिवासी असून त्यांनी साधारण तीन वर्षापूर्वी आपले दुकान पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलात सुरू केले होते.त्यांना त्यात चांगले यश आले होते.दरम्यान तेथील वाढता व्यवसाय पाहून चोरट्यांनी त्यांचेवर वक्रदृष्टी झाली होती.त्यांनी त्यांचेवर पाळत ठेवून आज सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास हातात नंग्या तलवारी घेऊन दुकानात प्रवेश केला होता.मात्र तो पर्यंत ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली नव्हती मात्र चोरट्यांनी आत प्रवेश करून सर्व सोने नाणे आपल्या गाठोड्यात बांधून बाहेर जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी आपल्या हातातील तलवार घेऊन व पुढे सदर सुवर्णकार यांना आपल्या बचावारार्थ बाहेर काढल्यावर उपस्थित ग्रामस्थांच्या ही गंभीर बाब लक्षात आली होती.त्यांनी त्यांना प्रतिकार करण्यास दगडांचा भडिमार केला असता त्यांचा नाईलाज झाला होता.मात्र ग्रामस्थ मोठया संख्येने जमा झाल्याने त्यातील एक जण आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाला आहे.मात्र त्यांची नावे अद्याप समजली नाही.पोलिस तपासात ती लवकरच निष्पन्न होणार आहे.यात सचिन औताडे यांनीही मोलाची कामगिरी केली असून एक तलवारीचा वार त्यांनी हुकवला आहे.दरम्यान आरोपी कडे तलवारी सह गावठी कट्टा,चाकू,सुरे आदी हत्यारे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी राजेंद्र कोल्हे,सचिन औताडे यांनी दिली आहे.
दरम्यान आताच आलेल्या माहितीनुसार पोलिस विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांनी आपले पथकासह घटनास्थळी हजर होऊन आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन शिर्डी कडे प्रयाण केले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.मात्र सदर चोरट्यांनी किती माल गुंडाळला होता याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.
सदर सुवर्णकारास जीवावर बेतले होते मात्र ते बोटावर निभावले असल्याची नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे.नागरिकांनी सजगता दाखवल्याने त्यांचा मालहही वाचला आहे.मात्र या झटापटीत त्यांना किती मारहाण झाली याचा अद्याप खुलासा झालेला नाही.दरम्यान या घटनेने पोहेगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान शिर्डी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन शिर्डी गाठली असुन फिर्याद घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असल्याची माहिती पोलीस अधिकारी वमने यांनी नुकतीच दिली आहे.
बातमी अद्यावत होत आहे….