जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कोपरगाव शहरातील…या ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव- (प्रतिनिधी)

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक 
व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुधाकर (आप्पा) गोपाळराव कुलकर्णी (येसगावकर) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.सुधाकर कुलकर्णी हे भाजप चे माजी प्रदेशाध्यक्ष खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे विश्वासू सहकारी गणले जात.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  स्व.सुधाकर कुलकर्णी यांनी आपल्या हयातीत राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून यशस्वी धुरा सांभाळली होती.सन-१९६७-६८ मध्ये अखिल भारतीय जनसंघ-महाराष्ट्र प्रदेशचे अधिवेशन कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडले होते.त्यावेळी अध्यक्ष दिनदयाळ उपाध्याय यांचे
मुक्कामाची सोय स्व.सुधाकर कुलकर्णी यांचे निवासस्थानी (गुरुद्वारा रोड) येथे करण्यात आली होती.कारण त्यावेळच्या माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांचेसह मोजक्या कार्यकर्त्यांत सुधाकर कुलकर्णी गणले जात असत.अन्य कार्यकर्त्यांच्या तुलनेत त्यांची आर्थिक व घरची स्थिती बरी गणली जात असे.


त्याकाळी युवा फळीत आघाडीत असलेल्या सुधाकर कुलकर्णी (येसगावकर) यांचा उत्साह आणि जोश लक्षवेधी होता.त्यांच्या कार्याची व त्यागाची दखल घेऊन कोपरगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी विजय सूर्यभान पा.वहाडणे हे असताना २०१७ मध्ये नगरपरिषदेच्यावतीने झालेल्या छ.शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुधाकर कुलकर्णी यांना देऊन त्यांचा विजय वहाडणें यांनी त्यांचा बहुमान केला होता.सत्तरच्या दशकात स्व.कुलकर्णी यांनी कबड्डीसह अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्या असल्याच्या आठवणी स्व.पत्रकार स्व.स.म.कुलकर्णी,
स्व.डी.के.सोनवणे आदी मान्यवर प्रसंगी जागृत करत असत.


स्व.सुधाकर कुलकर्णी हे भाजप चे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान पाटील वहाडणे यांचे विश्वासू सहकारी गणले जात.त्यांच्या निधनाबद्दल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,विनायक गायकवाड,सोशल मीडिया सेलचे प्रदेश सचिव समीर अंबोरे,योगेश वाणी,राजेंद्र खिलारी आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close