आरोग्य
… गावात,’मोफत वैद्यकीय शिबिर’ उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोळपेवाडी येथील सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,आयुर्वेद कॉलेज,आणि जवळके ग्रामपंचायत याच्या संयुक्त विद्यमाने जवळके हनुमान मंदिराच्या सभागृहात मोफत वैद्यकीय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याचा जवळके आणि परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“सदर सर्वरोग निदान शिबिरात २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे तर २३ हून अधिक रुग्णांवर सुप्रसाद मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोळपेवाडी येथे उपचार करण्यात येणार आहेत”- रवींद्र निकम,मुख्यकार्यकारी अधिकारी,कोळपेवाडी,नॉलेज सिटी.
राज्यातील नागरिकांना मोफत शिक्षण,आरोग्य हा नागरिकांचा अधिकार असून त्यासोबत चांगले रस्ते वीज,पिण्याचे पाणी हा सगळ्याचा माफक दरात अधिकार आहे.त्यासाठी सेवाभावी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या नागरिकांना सेवा देण्याचे त्यांचे काम आहे.या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कोळपेवाडी येथील सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,आयुर्वेद कॉलेज,आणि जवळके ग्रामपंचायत याच्या संयुक्त विद्यमाने जवळके हनुमान मंदिराच्या सभागृहात मोफत वैद्यकीय शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित केले होते.
त्यावेळी त्याचे उद्घाटन जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात व सदस्या इंदुबाई नवनाथ शिंदे यांच्या हस्ते तर शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख व पत्रकार नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,नवनाथ शिंदे,ग्रामविकास अधिकारी सतीश दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळपेवाडी नॉलेज सिटीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश कोळपे यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी हॉस्पिटलचे संचालक धनंजय कोळपे,वैद्यकीय संचालक डॉ.यशोधन पितांबरे, विपणन अधिकारी विक्रम कटकाळे,प्रसिध्दी प्रमुख शहानवाज शहा,मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र निकम,वैद्यकीय अधिकारी डॉ.हिना शेख,सहाय्यक वैद्यकीय अधिकारी वैजयंती चव्हाण,नर्सिंग विभाग प्रमुख योगिता आयनोर,वैजयंती चव्हाण,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य कार्यकर्ते दत्तात्रय जगताप,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,वनिता रखमा वाकचौरे,भिवराज थोरात,विठ्ठल गणपत थोरात,कानिफनाथ थोरात,रखमा वाकचौरे,विजय शिंदे,लक्ष्मण थोरात,गणेश थोरात,गणेश कानडे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर सर्वरोग निदान शिबिरात २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे तर २३ हून अधिक रुग्णांवर सुप्रसाद मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोळपेवाडी येथे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र निकम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.