गुन्हे विषयक
…या शहरात पुन्हा गोवंश हत्या सुरूच !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
शहरात गोवंश जनावरांची पुन्हा पुन्हा कत्तल होवून त्याची सर्रास विक्री केली जात असल्याची घटना घडत असून पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ५ आरोपींवर गुन्हा दाखल केला असुन १ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. वारंवार होत असलेल्या मुक्या गोवंश जातीच्या जनावरांची होत असलेल्या हत्या चिंतेचा विषय बनला आहे.

आयशा कॉलनी संजयनगर या ठिकाणी साठ हजार किमतीचे तीन गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळून आले,त्याच प्रमाणे हाजी मंगल कार्यालय,आयशा कॉलनी जवळ पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल केलेली होती,त्या ठिकाणी जनावरांचे पन्नास किलो मांस व वीस कातडी,वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सतरा हजार सातशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
गेल्या पाच सहा महिन्या पूर्वीच आयेशा कॉलनी ,संजय नगर भागात अवैध कत्तली सुरू असल्याच्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनांनी सदर गोवंश जनावरांच्या कत्तली थांबवावी यासाठी आंदोलन छेडले होते.सदर अवैध अतिक्रमणे व गौवंश हत्या थांबवावी असा इशारा दिल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेने पोलीस बंदोबस्ता मध्ये अवैध अतिक्रमणे काढून कत्तलखाणे बंद केली होती.

परंतु आजही हे कत्तलखाने अगदी जोमाने व राजरोसपणे सुरू आसल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली गोपनीय माहिती नुसार पाच विविध ठिकाणी छापे मारण्यात आले .ह्या मध्ये महेबूब कॉलनी,संजय नगर येथे पंधरा हजार रुपये किमतीचे गोवंश जातीचे दोन जनावरे, तसेच आयशा कॉलनी संजयनगर या ठिकाणी साठ हजार किमतीचे तीन गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळून आले,त्याच प्रमाणे हाजी मंगल कार्यालय,आयशा कॉलनी जवळ पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल केलेली होती,त्या ठिकाणी जनावरांचे पन्नास किलो मांस व वीस कातडी,वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सतरा हजार सातशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
त्याचप्रमाणे हाजी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आयशा कॉलनी येथे जनावरांची कत्तल केलेली होती त्या ठिकाणी जनावरांचे चाळीस किलो गोमांस दहा जनावरांची कातडी व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असे एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे,, तर आयेशा कॉलनी संजय नगर कोपरगाव येथे मटन मार्केट या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवंश जातीचे चारशे पंचवीस किलो गोमांस व कातडी व कत्तलीचे साहित्य असा असा ५२५किलो गोमांस ३०जनावरांचे कातडे , कत्तलीचे साहित्य असे एकूण १लाख६८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरचे गोमांस व कातडी सॅम्पल राखून बाकी गोमांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक भगवान माथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. आशिष शेळके ,सपोनि किशोर पवार,,पोसई किशोर हांडोरे पोहकॉ किशोर जाधव,दिपक रोकडे,लिंबोरे, दिगंबर शेलार,कुंढारे व इतर पोलिस कर्मचारी यांनी कारवाई केली