जलसंपदा विभाग
निळवंडेच्या पाण्याने शेवटचे पाझर तलाव भरा-अन्यथा आंदोलन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर अ.नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील सहा गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्पाच्या दुसऱ्या चाचणीचे पाणी आवर्तन बंद न करता दुष्काळी गावांतील उर्वरित पाझर तलाव भरण्यासाठी त्वरित द्या अन्यथा निळवंडे कालवा कृती समिती जलसंपदा विभागाच्या विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दिला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी निवडणुका पाहून स्थानिक नेत्याच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२६ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन,साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन,महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन,साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न केले आहे.मात्र यातील उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० तर उजवा कालवा २५ टक्के,वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.भूसंपादन अद्याप बाकी आहे.एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून त्यात निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर येथील खंडपिठात विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी अड्.अजित काळे यांचे सहकार्याने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल केली होती त्यात सरकारने हा प्रकल्प ऑक्टोबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर दिले होते.मात्र वेळोवेळी सहा मुदतवाढी देऊनही हा प्रकल्प जलसंपदा विभागाने पूर्ण केलेला नाही.त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढ घेऊन सदर डावा कालवा हा मार्च-२०२३ तर उजवा कालवा हा जून-२०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयासमोर दिले होते.मात्र त्यास जलसंपदा विभागाने त्या आदेशाला वारंवार चुना लावला आहे.त्यानंतरही दि.११ जुलै २०२२ ते ०५ जून २०२३ दरम्यान वारंवार सहा मुद्तवाढी घेऊनही त्या पाळल्या नाही.त्यामुळे समितीचे याचिकाकर्ते पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत काले आदींनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या मार्फत न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.
त्या वेळी उच्च न्यायालयाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांनी सरकारला वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सक्त ताकीद दिली होती.उच्च न्यायालयाने सरकारला मुदतीत प्रकल्प पुर्ण न केल्याने दि.१३ जुलै २०२३ रोजी अवमानना नोटीस काढली व जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले आहे.तसेच अकोले तालुक्यातील चाचणीत डाव्या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊन अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्याची नागरपूर येथील,’पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ (मेरी) यांच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली आहे.वारंवार मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण न केल्याने न्यायालयाचा संताप झालेला असताना आधी ३१ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तर २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आगामी निवडणुका व मतपेट्या डोळ्यासमोर ठेऊन स्थानिक नेत्यांनी दोनदा जलपूजन करण्याची आपल्या कायमचा सवयी प्रमाणे हौस भागवून घेतली आहे.वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.त्यामुळे आत्ताच माय लेकराला धरेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या आवर्तनात किमान मनेगाव,काकडी,मल्हारवाडी,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,सायाळे,देवकौठे,पुंच्छ भागातील वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडलेले नाही.मात्र स्थानिक नेते ज्यांनी तीन पिढ्या वारंवार या प्रकल्पास विरोध करून पोलिसांकरवी शेतकऱ्यांवर लाठ्या-काठ्या चालवल्या व आपल्या दारू कारखान्यांना पाणी पळवले त्या नेत्यांची जलसंपदा विभागाचे अधिकारी मागेपुढे सेवाचाकरी करत आहे.तर त्यांचे आंदोलन प्रसंगी बिळात लपून बसणारे भाट आज त्यांना मुजरे करत आहे.दिल्लीत दहा वर्ष काम करूनही दमडीचा निधी न आणलेले ‘तमासगीर नेता’ शेतकरी मेळावे घेत आहे.तर त्यांचे तोतया समित्या ढोल ताशे वाजवत फिरताना दुर्दैवी चित्र दुष्काळी भागात दिसत आहे.कोपरगाव तालुक्यातील नेते त्यास अपवाद नाही.ज्यांनी निळवंडेचे पाणी पळविण्यासाठी आपली सारी कारकीर्द पणाला लावली त्यांचे हुजरे त्यांच्या मागेपुढे फिरून जनतेत संभ्रम निर्माण करत आहे.मात्र ज्यांनी दुष्काळी जनतेत जागृती करून खरे काम करून प्रसंगी लाठ्या-काठ्या खाणारे,कारागृहात जाणारे मात्र कोणाच्याही खिजगणतीत राहिले असल्याचे दिसत नाही.त्यामुळे जनतेत अच्छा-खांसा राग आहे.अद्याप या लढ्यात योगदान देणारे कार्यकर्ते पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे.त्यामुळे अजलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेऊन मनेगाव,काकडी,वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी,मल्हारवाडी,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,सायाळे,देवकौठे,पुंच्छ भागातील वाकडी,धनगरवाडी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.अन्यथा जनतेच्या रागाचा पारा चढल्याशिवाय राहणार नाही त यामुळे वरील दुष्काळी गावांना तातडीने पाणी सोडावे अशी मागणी रंगनाथ गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत नुकतीच कोपरगाव येथे कालवा कृती समितीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.त्यात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अर्धवट निळवंडे उजवा कालवा तातडीने पूर्ण करून प्रथम चाचणी पूर्ण करण्यासह अस्तरीकरण निविदा प्रसिद्ध कराव्या,दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे डावा कालवा संपूर्ण लाभक्षेत्रातील किमान पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पिण्याच्या पाण्यासाठी व चारा पिकांना वंचित गावांना तातडीने पाणी उपलब्ध करणे व सर्व बंधारे भरे पर्यंत आवर्तन बंद करू नये,निळवंडे मुख्य वितरण व्यवस्थेच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करून ते पूर्ण करून पुंछ दुष्काळी भागात पाणी पुरवठा करा,निळवंडे डावा कालवा अकोले तालुक्यातील अस्तरीकरण प्रथम करून नंतर बाकी अन्य कालव्याच्या अस्तरीकरण निविदेनुसार तातडीने पूर्ण करा,निळवंडे डाव्या कालव्यावर प्रमुख नद्या व नाले आदींवर एस्केप,व एच.आर.तातडीने पूर्ण करा,निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रात बंधारे भरण्यास ज्यांनी हा प्रकल्प करण्यास आजपर्यंत विरोध केला त्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप दूर करा.निळवंडे प्रकल्प अर्धवट असताना त्याचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण केले त्या बाबत जलसंपदा विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.व याबाबत उच्च न्यायालयाचे लक्ष वेधणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.निळवंडे प्रकल्प अर्धवट असताना त्याचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण केले त्या बाबत जलसंपदा विभागाचा झालेला खर्च माहिती अधिकारात विचारण्याचा निर्णय घेतलाअसल्याची माहिती रंगनाथ गव्हाणे यांनी शेवटी दिली आहे.
सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,संघटक नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,सचिन मोमले,अमोल साबदे,शशिकांत साबदे,भाऊसाहेब साबदे आदी मान्यवर उपस्थित होते.