जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कंटेनर-कार अपघात,दोन जखमी,गुन्हा नाही !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात वळणावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर (क्रं.एन.एल.०१ एन.५३२४) व एक टाटा इंडिका विस्टा कार (क्रं.एम.एच.१५ ई.ई.५७९) यांच्यात झालेल्या जोरदार टकरीत कारच्या पुढील भाग चक्काचूर झाला असून कंटेनरची इंधन टाकी फुटून इंधन रस्त्यावर इतस्ततः पसरले होते.दरम्यान या अपघातात किती जण जखमी झाले या बाबत पोलीस अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

  

पुणतांबा फाटा ते झगडे फाटा दरम्यान रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वी झाले असून त्या रस्त्यावर वहाने भरधाव वेगाने धावत असून त्यात अनेक वाहनांची वित्तीय तर अनेक प्रवाशांची जीवित हानी होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.अशीच घटना नुकतीच आज सकाळी ०९ वाजेच्या सूमारास घडली यात भरधाव कंटेनरने समोरून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या टाटा विस्टा कारला जोराची धडक दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नजीक असलेला पुणतांबा फाटा ते झगडे फाटा दरम्यान रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वी झाले असून त्या रस्त्यावर वहाने भरधाव वेगाने धावत असतात.त्यात अनेक वाहनांचे भरधाव वेगात जीवित व वित्तीय नुकसान होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.अशीच घटना नुकतीच आज सकाळी ०९ वाजेच्या सूमारास घडली यात भरधाव कंटेनरने समोरून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या टाटा विस्टा कारला जोराची धडक दिली आहे.त्यात पुढील बाजू चक्काचूर झाली आहे.या अपघाताने रस्त्यावर काचाचा खच पडला असल्याचे दिसून आले आहे.मात्र या कार मध्ये किती जण होते.व त्यातील किती जखमी झाले हे समजायला मार्ग नाही.मात्र आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असता जखमी उपचारार्थ हलवले असल्याचे दिसून आले आहे.घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी या अपघातात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती दिली आहे.या  बाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती घेतली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे कळवले आहे.त्यामुळे या दोन्ही वाहनांनी अपघाता नंतर आपआपसात सदर गुन्हा संमेटाने मिटवला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close