आंदोलन
…या जवानांच्या मानधनाला दिवाळीत कोलदांडा,संताप!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव,राहात्यासह राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानाचे गत चार महिन्यांपासून मानधन रखडले असून ते दिवाळीत तरी आपल्याला भेटेल या अपेक्षांवर पाणी फिरल्याने जवांनानी संताप व्यक्त केला आहे.व सदर मानधन आता तरी द्यावे अशी विनवणी सरकारला आमचे प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सण उत्सव,मोर्चे,कायदा सुव्यवस्था,दुष्काळ,आपत्कालीन परिस्थिती,युद्ध,महामारी,भूकंप,वाहतूक नियंत्रण निवडणूक,आदी सर्व सेवांमध्ये नेहमी अग्रस्थानी असणाऱ्या या गृह विभागाचा जवानांनी आजतागायत 79 वर्ष अव्याहत सेवा बजावली आहे.मात्र आज त्यांना मानधनाविना अडचणींचा सामना करावा लागत आहे याचे त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दिवाळी,ज्याला दीपावली असेही म्हणतात,हा प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो.यंदा हा उत्सव २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाईल.हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे,जो अंधारावर प्रकाशाचा,अज्ञानावर ज्ञानाचा,वाईटावर चांगल्याचा आणि निराशेवर आशेचा विजय दर्शवतो.भारत आणि जगभरातील लोक हा सण आनंद,भक्ती आणि एकतेने साजरा करतात.त्यासाठी सरकार विविध महामंडळे आपल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्याबरोबरच बोनस जाहीर करते.त्यामुळे सर्वांची दिवाळी आनंदात होते.मात्र यावेळी राज्याच्या गृह विभागाच्या जवांनाना याचा विचित्र अनुभव आला असून दिवाळी सन सुरू झाला असून काल वसुबारस तर आज धनत्रयोदशी संपन्न होत असताना मात्र गृह विभागाच्या जवानांच्या आशा आणि अपेक्षांवर सरकारने मात्र पाणी फिरवले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्यांना आता दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सण उत्सव,मोर्चे,कायदा सुव्यवस्था,दुष्काळ,आपत्कालीन परिस्थिती,युद्ध,महामारी,भूकंप,वाहतूक नियंत्रण निवडणूक,आदी सर्व सेवांमध्ये नेहमी अग्रस्थानी असणारा हा जवान आजतागायत कार्यरत आहे.त्यांनी गेली 79 वर्ष अव्याहत सेवा बजावली आहे.मात्र आज त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दुःख काही जवानांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.त्यामुळे सरकारने त्यांना तातडीने दिवाळी बोनस आणि त्यांचे गेले अनेक महिने थकेलेले मानधन तातडीने द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



